August 8, 2025

नवोदय तयारीसाठी कळंबमध्ये भव्य कार्यशाळा

  • ५०० पालक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
  • कळंब– फ्रेंड्स फॉरेवर फाउंडेशन, कळंब यांच्या वतीने आयोजित नवोदय कार्यशाळा या अनोख्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद लाभला. विविध तालुक्यांतून आलेले विद्यार्थी,पालक व शिक्षक अशा ५०० हून अधिक जणांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवत ती अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पाडली.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल कवडे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, नवोदय परीक्षेत ‘तडवळा पॅटर्न’ निर्माण करणारे तज्ञ मार्गदर्शक जगन्नाथ धायगुडे,बाळासाहेब जमाले,अनिल क्षीरसागर व शहाजीपुरी यांची उपस्थिती होती.
    कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये पार पडली.
    पहिल्या सत्रात,जगन्नाथ धायगुडे यांनी गणित विषयाची तयारी कशी करावी, तसेच पालकांची भूमिका कशी असावी, यावर सखोल मार्गदर्शन केले. “पालकांनी संवादातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा, हेच यशाचे मूळ आहे,” असे ते म्हणाले.
    अनिल क्षीरसागर यांनी इंग्रजी विषयाची भीती दूर करण्यासाठी व्यावहारिक टिप्स दिल्या.त्यांनी शब्दसंग्रह,व्याकरण,व सामान्य चुका टाळण्याचे उपाय स्पष्ट केले.
    दुसऱ्या सत्रात, शहाजीपुरी यांनी बुद्धिमापन चाचणीच्या तयारीसाठी सराव,शिस्त आणि सातत्य याचे महत्व सांगितले.
    बाळासाहेब जमाले यांनी मराठी विषयासाठी कवितांचा,अभंगांचा अभ्यास,बोलीभाषेचा उपयोग आणि शिक्षकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते “विद्यार्थी मित्र” या उपक्रमाचा लोगो अनावरण सोहळा पार पडला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगदीश गवळी,प्रास्ताविक डॉ. अभिजीत लोंढे तर आभार प्रदर्शन परमेश्वर मोरे यांनी केले.
    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राहुल कवडे,डॉ. अभिजीत लोंढे,प्रा.जगदीश गवळी,गोपाळ उबाळे,परमेश्वर मोरे,भैयासाहेब खंडागळे,ॲड. सुजीत तिर्थकर,दिनेश आष्टेकर, सतिश घाडगे,आश्रुबा कस्पटे, गोविंद रणदिवे,गजेंद्र पुरी,डॉ. भगवंत जाधवर,डॉ.गिरीष कुलकर्णी,डॉ.सुधीर आवटे,संदीप शेडगे,बाबा पवार,शैलेश गुरव, विनोद दळवी,डॉ.सुशिल ढेंगळे, संतोष लांडगे,राजेश नागटिळक, सचिन हारकर,शशिकांत बारटक्के,बजरंग घुले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!