कळंब (राजेंद्र बारगुले) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेतून आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.१८ जुलै २०२५ रोजी साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा.श्रीकांत पवार यांच्या हस्ते डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशिका कोमल मगर,आदित्य गायकवाड, दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांना उजाळा देत अभिवादन केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी