कळंब – विश्वरत्न परमपूज्य बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,कळंब यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्तव्यदक्ष सभापती शिवाजी (अप्पा) कापसे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.११ जुलै २०२५ रोजी शहरातील परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी त्यांचा विश्वस्त सुनिल गायकवाड व इतर पदाधिकारींच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच बहुजनाच्या न्यायहक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होणाऱ्या ‘सा.साक्षी पावनज्योत’ या विशेषांक कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांच्या हस्ते भेट देण्यात आली.उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी