February 9, 2026

साई कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बीसीएस व बीसीए परीक्षेत घवघवीत यश

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्च-एप्रिल २०२५ सत्रातील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,रांजणी येथील साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी उज्वल कामगिरी करत तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ९८ टक्के लागला आहे.
    बीसीएस (तृतीय वर्ष) विभागात यशस्वी विद्यार्थी –
    प्रथम- वैष्णवी नवनाथ घटमल (शिराढोण) – 87.90%,द्वितीय- आकांक्षा अंगद साळुंके (घारगाव) – 87.50%,तृतीय – साक्षी आदमाने (रांजणी) – 87.30%
  • बीसीए (तृतीय वर्ष) विभागात यशस्वी विद्यार्थी –
    प्रथम- कादंबरी रामभाऊ ढवारे (ठाणे) –78.10%,द्वितीय-साक्षी बुबासाहेब देशमुख (अंजनपूर कोपरा) – 78.00%,तृतीय – नांगरे प्रतिभा शिवाजी (जायफळ) – 76.90%
    या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे, सचिव ए.बी.ठोंबरे,उपाध्यक्ष डी.आर.काळदाते,समन्वयक बी.के.भातलवंडे,कृषिभूषण पी.एस.आवाड,डॉ.ए.बी.जगताप, प्र.प्राचार्य जे.सी.गवळी तसेच प्रा. एन.एम.चाऊस,प्रा.एम.के.साबळे, प्रा.ए.डी.जाधव,प्रा.पी.जी.मोरे, प्रा.एस.आय.शिंदे,
    प्रा.डी.एल.शेळके,प्रा.एस.एच.
    शेख,प्रा.बी.डी.लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!