September 21, 2026

विद्याभवन हायस्कूल कळंब येथे जागतिक ऑलिंपिक डे साजरा

  • कळंब (विशाल पवार) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखालील विद्याभवन हायस्कूल कळंब येथे दि.२४ जून २०२५ रोजी जागतिक ऑलिंपिक डे साजरा करण्यात आला.यावेळी प्रशालेतील विद्यार्थी राष्ट्रीय,राज्यस्तरीय,विभागस्तरीय, क्रीडा स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यामध्ये वसुंधरा नांगरे हिची आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेमधील निवड झाल्याबद्दल तसेच बिरसा उबाळे, थोरबोले स्नेहा राज्यस्तरीय हॉलीबॉल संघ सहभाग,शिंदे विनय,शिंदे विवेक,बोंदर राहुल, राज्यस्तरीय स्क्वॅश,जमादार माहेश्वरी विभागीय स्पर्धेत सहभाग,शिंदे प्रथमेश विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी वरील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक सतीश कानगुडे, विजयकुमार ढोले यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती प्रशालेचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार, उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,यांची व्यासपीठावरती उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार एस.जे यांनी केले तर आभार सोनके ज्योतीराम यांनी मानले.
error: Content is protected !!