धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात शंभर एकराहून अधिक क्षेत्रावरील सोयाबीन उगवल नसल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने धाराशिव तालुक्यातील ढोकी,कोल्हेगाव, गोरेवाडी शिवारात अधिकाऱ्यांना घेऊन आमदार कैलास पाटील यांनी जाऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. आमदार पाटील यांनी बोगस बियाणांच्या विरोधात प्रलंबित असलेला कायदा पारित करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटलं आहे.बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान सरकारने कंपन्यांकडून वसूल करून द्यावे.यासाठी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आवाज उठवणार असून आमदार पाटील यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. कृषी विभागाकडून पंचनामे करत ग्राहक मंचात तक्रार करण्याच्या शेतकऱ्यांना सल्ला आमदार पाटील यांनी ग्राहक मंचाने बियाणी कंपनी विरुद्ध निकाल दिल्यानंतर कंपन्यावरच्या कोर्टात जातात आणि शेतकऱ्यांसमोर कोर्टाच्या वाऱ्या करण्याची वेळ येते हे सर्व बंद झाले पाहिजे.शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला या बियाण्यांच्या कंपन्यांनी द्यावा, अन्यथा याविरोधात विधानसभेत आवाज उठवू असा इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान