कळंब – तालुक्यातील बोरगाव धनेश्वरी येथील युवा नेतृत्व सुशील नामदेव चोरघडे यांची शिवसेना पक्षाच्या ईटकूर जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक व अजित पिंगळे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अनंत वाघमारे तसेच कळंब शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हूलजूते यांनी सुशील चोरघडे यांना देण्यात आलेल्या निवडीच्या पत्रामध्ये म्हटले आहे की,हिंन्दु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्क प्रमुख खा.रविंद्र गायकवाड, शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख भगवानजी देवकते,अजित पिंगळे तसेच जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या आदेशाने आपली शिवसेना पक्षाच्या ईटकूर जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदी निवड केली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर अनंत दिघे यांची शिकवण याचा प्रचार आणि प्रसार तसेच शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सुशील चोरघडे यांच्या निवडीबद्दल बोरगाव ध.शिवसेना शाखाप्रमुख अमोल चोरघडे,उपशाखा प्रमुख सचिन चोरघडे,कार्याध्यक्ष मनोहर सांगळे,कोषाध्यक्ष अतुल जाधव, सचिव गजानन पाटील,सहसचिव बालाजी सांगळे,संघटक अशोक चोरघडे, रंजीत चोरघडेसह ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा