कळंब – हागवाने प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक झाला आणि लग्न समारंभाची आचार संहिता लागू केली,त्याचे आचरण कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांनी मुलाच्या लग्नात या आचार संहिताचे पालन करण्याचे ठरवले,आणि उच्चशिक्षित जोडप्याचा विवाह शंभर नातवाईक यांच्या समोर नोंदणी पद्धतीने पुणे येथे करण्यात आला. मराठा समाजाने घालून दिलेल्या आचार संहिताचे राज्यातील हे पहिलेच लग्न असेल.मराठा समाजाने घालून दिलेल्या आचार संहिताचे पालन करण्यात आले, कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांचे चिरंजीव ॲड.प्रफुल्ल व हरिदास पवार पाटील यांची कन्या इंजी.ऋचा यांचा हळदी समारंभ पुणे येथे अगदी मोजक्याच मंडळी मध्ये संपन्न झाला.व हे दोघे ही उच्च शिक्षित असून,त्यांचा मोजक्याच नातेवाईक यांच्या समवेत नोंदणी पद्धतीने विवाह शुक्रवारी करण्यात आला. या विवाह सोहळ्या मध्ये ना घोडा,ना वाजंत्री,ना फटाक्यांची आतिषबाजी,फक्त नवरदेवाला फेटा बांधण्यात आला होता.आहेरांची,कपड्यांची कसलीही रेलचेल नव्हती.मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रण व रूचकर भोजनाची मेजवानी.कळंब येथील माजी नगरसेवक सतीश टोणगे यांच्या पुतण्याचा हा विवाह आदर्श घेण्या सारखा पार पडला. या नोंदणी विवाह सोहळ्या साठी प्रभारी विवाह अधिकारी चंद्रकांत हाळे,नितीन जाधव,अविनाश गायकवाड यांनी कायदेशीर शपथ देऊन , विवाह झाल्याचे जाहीर केले.
@ मराठा समाजाने विवाहाच्या संदर्भात आचारसंहिता लागू केल्यापासून मनात विचार घोळत होता मी मुला मुलीशी चर्चा केली दोन्ही कुटूंबियानी सल्ला मसलत करून आम्ही छोटेखानी विवाह करण्याचा ठरवले व तो आज थाटामाटात संपन्न झाला.अगदी पन्नास हजारात हा विवाह संपन्न झाला.
More Stories
जनसुरक्षा विधेयकाच्या आडून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरवण्याचा सरकारचा प्रयत्न – सतीश काळे
“३०० कोटींचा गूढ व्यवहार… पण माथाडी कायद्याची बदनामी थांबवा!” – डॉ.बाबा आढाव यांची स्पष्ट भूमिका
पंढरीच्या वारीत ‘अर्बन नक्षल’ असल्याचा वक्तव्य करणाऱ्या आ.मनीषा कायंदे यांचा महा.अंनिसच्या वतीने तीव्र निषेध