कळंब – राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव २०२५ च्या अनुषंगाने अहिल्यादेवींच्या जिवनावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.याला कळंब शहर व तालुक्यातील विविध शाळांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते गुरूवार दि २९ मे २०२५ रोजी जय भवानी फंक्शन हॉल, परळी रोड, कळंब येथे सकाळी ठिक ९-३० वा आयोजित करण्यात आला आहे. या बरोबरच एस एस सी परिक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १००% गुण मिळविणारे विद्यार्थी, निकालाची उज्वल परंपरा राखणा-या शाळा, विविध अभ्यासक्रमासाठी निवड झालेले विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, क्रिडा क्षेत्रात मिळविलेले विषेश प्रावीण्य, ई चा सत्कार करण्यात येणार आहे. तरी गुणवंतांना प्रोत्साहित करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आयोजकां तर्फे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन