August 8, 2025

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे – ना.रामदास आठवले

  • पुणे – माथाडी कायद्याचे काटेकोर अंमलबजावणीत येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी मी जातीने लक्ष घालेन असे आश्वासन केंद्रीय समाजकल्याण मंत्री ना.रामदास आठवले यांनी डॉ.बाबा आढाव यांना दिले.
    डॉ.बाबा आढाव यांचे तब्येतीची चौकशी करण्यासाठी, बिबवेवाडी येथील बाबांचे घरी आज सायंकाळी रामदास जी पोहोंचले, तेंव्हा बाबांच्या तब्येतीबरोबरच अनेक प्रश्नावर बाबांशी चर्चा केली.
    यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे व संघटक साथी संतोष नांगरे ही उपस्थित होते.
    पुण्यातील रेल्वे मालधक्का बंद केल्याने,शेकडो असंघटित कष्टकऱ्यांचे रोजगार बुडाल्याने ते देशोधडीला लागल्याचा प्रमुख मुद्दा बाबांनी उपस्थित केला.
    मुंबईतून जसा गिरणी कामगार हद्दपार केला तसा माथाडी कायद्यातील बदलामुळे कारखान्यातील माथाडी कामगार हद्दपार करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे बाबांनी समाजकल्याण मंत्र्याचे कानावर घातले.राज्यातील हमाल कष्टकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण अशा माथाडी कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी साठी मी स्वतः जातीने प्रयत्न करतो असे आश्वासन रामदासजी आठवले यांनी यावेळी दिले.
    रेल्वे मालधक्का व अन्य माथाडी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी, सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर , येत्या २९ मे रोजी मुंबई येथे बैठक आयोजित करतो असे ठोस आश्वासन ही दिले.
    यावेळी बाबांनी,ड्रेनेज मधील विषारी वायूमुळे गुदमरून शेकडो कामगार दरवर्षी मृत्युमुखी पडतात,तसेच स्मशान भूमीत काम करणाऱ्या कष्टकऱ्यांचा तर कोणीच वाली राहिलेला नाही.
    समाजकल्याण खात्याचे मंत्री म्हणून तुम्ही अशा प्रश्नात तत्काळ लक्ष घातले पाहिजे असेही बजावले. तेंव्हा रामदासजी म्हणाले की बाबा, तुम्ही मार्गदर्शन करा,अशा सर्व सामाजिक प्रश्नावर मी व माझे मंत्रालय तुमच्या बरोबर असेल….. तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांत हि समाजकल्याण. खात्यास जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व करणार असेही आश्वासन बाबांना दिले.
    सुमारे एक तासानंतर निघतांना रामदास जी नी बाबांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी पुन्हा पुन्हा विनंती केली.
error: Content is protected !!