खोंदला – दिनांक 16 मे 2025 रोजी श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय खोंदलाच्या प्रांगणामध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु. राजनंदिनी रामहरी नवले, द्वितीय कु.आदिती बंडू लांडगे,तृतीय तसेच कु.शेख फिझा रशीद, तसेच शेख शबनम शकील, लांडगे तेजस्विनी विकास, मुळीक अंकिता सुरेश,गालफाडे वैष्णवी छत्रुगुण,शिंदे विठ्ठल मदन ,हजारे आर्यन दयानंद, कांबळे सुभाष संजय, शिंदे मुकुंदराज बलभीम, शिंदे ज्ञानेश्वरी मधुकर, शिंदे भरत राहूल , कदम ओमकार भागवत , लांडगे वैभव दत्तात्रय इत्यादी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सचिनजी लांडगे,शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक घोळवे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती धाबेकर एस.जे.हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सचिनजी लांडगे, प्रा.घोळवे यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार करण्यात आला. सहशिक्षक लांडगे,घोळवे,श्रीमती धाबेकर,भोंडवे, दिपक राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी