कळंब – 12 वी बोर्ड परीक्षेचा ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संचलित शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयचा निकाल 95% एवढा लागला असून कला शाखेचा निकाल 94.18%,वाणिज्य शाखेचा निकाल 97.5% आणी विज्ञान शाखेचा निकाल 94.91 % एवढा लागला आहे.
1) कला शाखेतील टेकाळे उत्कर्षां (80.66%) प्रथम क्रमांक, माळी ज्योती(80.50%) द्वितीय क्रमांक,आणी पवार स्वेता(76.50%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले.
2)वाणिज्य शाखेतील हाके कार्तिक(80.00%) प्रथम क्रमांक,गायकवाड काजल द्वितीय क्रमांक(79.33%) आणि शिंपले स्वेता(79.16%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले 3)विज्ञान शाखेतील साखरे वेदिका(85.00%) प्रथम,कोठावळे अमृता(82.83%) द्वितीय,आणि चोरघडे सुप्रिया(81.66%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले.तसेच
4)वोकेशनल कोर्स ( mcvc ) चा निकाल 93.75% एवढा लागला असून जाधव तनुजा(68.17%) प्रथम क्रमांक, सुतार स्नेहल(67.83%) द्वितोय क्रमांक आणि भिसे तृतीय(65.50%) तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले.विध्यार्थ्यांनी घेतलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर,सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,संस्थेचे सर्व संचालक,व पदाधिकारी तसेच महाविद्यालचे प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य मिटकरी अप्पासाहेब,उपप्राचार्य जाधव के.डी.पर्यवेक्षक हंडीबाग के.के तसेच महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा