धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 159 कारवाया करुन 1,34,750 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-नितीन लक्ष्मण माने, रा.चिंचवली जागीर ता.उमरगा जि. धाराशिव हे दि.28.04.2025 रोजी 11.45 वा. सु.बालाजी नगर येथे योगेश घोडके यांचे घराचे शेजारी पत्राचे शेडसमोर अंदाजे 16,200 ₹ किंमतीची 200 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-चेतन चंद्रकांत पंडागळे, वय 30 वर्षे, रा. मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.28.04.2025 रोजी 16.35 वा. सु.समाधान ट्रेडर्स दुकानाचे बाजूला मस्सा खंडेश्वरी येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.28.04.2025 रोजी 14.35 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत जकेकुर चौरस्ता येथील उड्डाण पुलाचे खाली टपरी समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बिराप्पा दत्तु सुर्यवंशी, रा. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.35 वा.सु. जकेकुर चौरस्ता येथील उड्डाण पुलाचे खाली टपरी समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,060 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मच्छिंद्र रामलिंग खरडकर, वय 60 वर्षे, रा. हासेगाव केज ता. कळंब जि. धाराशिव यांचे राहते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.27.04.2025 रोजी 21.00 ते 28.04.2025 रोजी 02.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील व घराशेजारी लिंबराज प्रल्हाद काळे असे दोघांच्या घरातील 61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 15,000₹ असा एकुण 4,88,258 किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मच्छिद्र खरडकर यांनी दि.28.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (4),305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-निलावती महादेव ठोंगे, वय 80 वर्षे, रा. हिंगणगाव बु.ता. परंडा जि. धाराशिव यांचे हिंगणगाव शिवारातील शेत गट नं 300ते 330मधील ज्वारी व गव्हाचे पिक अंदाजे 30,000₹ किंमतीचे आरोपी नामे- कल्पना बाबासाहेब ठोंगे,आकश बाबासाहेब ठोंगे, अभिजीत बाबासाहेब ठोंगे ,विशाल बाबासाहेब ठोंगे यांनी दि.03.03.2025 रोजी 10.00 वा. सु. घेवून जात असताना फिर्यादीने थांबवले असता नमुद आरोपींनी फिर्यादीस दमदाटी करुन शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निलावती ठोंगे यांनी दि.28.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-शाहु विनायक पाडे, वय 40 वर्षे, रा.पिंपरी ता. कळंब जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची काळ्या रंगाची एचएफ डिलक्स 13 एस त्यावर लाल पांढरे पट्टे असलेली मोटरसायकल ही दि. 24.04.2025 रोजी 20.00 ते 22.30 वा. सु. गोरोबा काका मंदीराकडे जाणारे रोडलगत असलेल्या सरकारी दवाखान्याचे शेजारील पार्कींग मधुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शाहु पाडे यांनी दि.28.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-जलाल्लोद्दीन कलीमोद्दीन काझी, वय 42 वर्षे, रा.एस बी आय बॅक जवळ ढोकी ता. जि. धाराशिव यांच्या दोन मुह्रा जातीच्या म्हैसी अंदाजे 70,000₹ किंमतीच्यादि. 21.04.2025 रोजी 06.20 वा. सु. फिर्यादी यांचे ढोकी शिवारातील शेत गट नं 206 मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जलाल्लोद्दीन काझी यांनी दि.28.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-भारत दिलीप राठोड, सतिष दिलीप राठोड, अभिषेक एकनाथ पवार, दिनेश भारत राठोड, सविता भारत राठोड, शाहुबाई एकनाथ पवार,विमल दिलीप राठोड सर्व रा. कौडगाव तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि.27.04.2025 रोजी 18.00 वा. सु. कौडगाव तांडा येथे फिर्यादी नामे- विजय गणेश राठोड, वय 48 वर्षे, रा. कौडगाव तांडा ता.जि. धाराशिव यांना व त्यांची मुलगी पुजा यांना नमुद आरोपींनी पोलीसात तक्रार देण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विजय राठोड यांनी दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(3), 189(2), 191(2), 190अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-आयान मुन्ना कुरेशी, सोहेल कुरेशी, आलीशा कुरेशी, बेबी कुरेशी, सिरास कुरेशी, सोनु कुरेशी सर्व रा. मिल्ली कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.25.04.2025 रोजी 20.00 वा. सु. मिल्ली कॉलनी धाराशिव येथे फिर्यादी नामे-वशीमा मोहशीन कुरेशी, वय 28 वर्षे, रा. मिल्ली कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केली. फिर्यादीचा दिर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यास लोखंडी चाकुने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वशीमा कुरेशी यांनी दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2) (3), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बापुराव महादेव उर्फ बाबासाहेब लोखंडे,दत्तात्रय सुरेश लोखंडे, महादेव नरहरी लोखंडे, सुरेश नरहरी लोखंडे, सुनिता महादेव लोखंडे,सोमनाथ महादेव लोखंडे,कमलाबाई सुरेश लोखंडे, पल्लवी दत्तात्रय लोखंडे, द्रोपदी नरहरी लोखंडे सर्व रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांनी दि.22.04.2025 रोजी 20.00 वा. सु. करजखेडा चौरस्ता येथे फिर्यादी नामे-बालाजी मधुकर लोखंडे, वय 49 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी कोर्टात झालेली तडजोड मान्य नाही असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता आडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यास आलेले साक्षीदार यांना नमुद आरोपींनी त्यांनाही मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी लोखंडे यांनी दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3), 189(2), 191(2), 191(3), 190(1), 126(2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
ढोकी पोलीस ठाणे: मयत नामे-शहाबुद्दीन माहमुद मुलाणी, वय 89 वर्षे, रा. सत्यपुरी नगर तेर ता. जि. धाराशिव दि.21.04.2025 रोजी 11.00 वा. सु. तेर येथे महाराष्ट्र संत विद्यालय समोर पाय फिरत होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एए 9639 चा चालक आरोपी नामे-अथर्व शिंदे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यानी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून शहाबुद्दीन मुलाणी यांना धडक दिली. या अपघातात शहाबुद्दीन मुलाणी हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रियाजोद्दीन इसमोद्दीन मुलाणी, वय 34 वर्षे, रा.सत्यपुरी नगर तेर ता. जि. धाराशिव यांनी दि.28.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब), 106(1)(2) सह कलम 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी मयत नामे-रघुनाथ दयानंद शिंदे, वय 21 वर्षे, रा.कसगी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.14.03.2025 रोजी 18.00 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 1479 वरुन जात होते. दरम्यान उमरगा ते आळंद जाणारे रोडवर आयशार टेम्पोचे शोरुम जवळ व्यंकट पवार यांचे शेताजवळ आरोपी मयत रघुनाथ शिंदे यानी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकलच रोडलगत असलेल्या झाडाला धडकून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-श्रावण रघुनाथ शिंदे, रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब), 106(1) सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“लैंगीक अत्याचार.”
लोहारा पोलीस ठाणे :एका गावातील 18 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) सन 2022 ते दि.22.09.2023 रोजी 12.30 वा. सु.ते हिस गावातील एका तरुणांनी माझे तुझ्यावर प्रेम आहे तु माझ्यासोबत बाहेर चल नाहीतर तुझ्या भावास मारुन टाकीन अशी धमकी देवून तिस बळजबरीने मोटरसायकलवर बसवून झाडीत घेवून जावून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. झाल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुझ्या भावास जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं.कलम-376, 376(2)(एन), 506 सह पोक्सो कलम 4, 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :एका गावातील 35 वर्षीय महिला (नाव- गावगोपनीय) दि.28.04.2025 रोजी 02.00 वा. सु. हिस व तिचे मुलीस एका गावातील तीन तरुणांनी वाईट उद्देशाने झोंबाझोंबी करुन नमुद महिलेस त्यातील एका तुरुणांनी तुझ्या मुलीचे लग्न माझ्या भावा सोबत का लावून देत नाही असे म्हणून तिस घराचे बाजूला अंधारात ओढत नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. झाल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं.कलम-376, 376(2)(एन), 506 सह पोक्सो कलम 4, 6 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :एका गावातील 21 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.27.04.2025 रोजी 12.00वा. सु. हिस गावातील एका तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.28.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-69 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन