मोहा (अविनाश घोडके ) – विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण प्राचार्य संजय जगताप यांनी दिले नाही,तर त्यांच्यात चारित्र्य विकास आणि चांगले संस्कार रुजवले.खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या जगताप यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले.प्राचार्य संजय जगताप यांनी अनेक वर्षे या संस्थेमध्ये अखंडितपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले असल्याचे प्रतिपादन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी केले. ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संजय जगताप हे दि.२८ एप्रिल २०२५ रोजी वयामानानुसार प्राचार्य तथा मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले.हा सेवा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ.मोहेकर यांनी आपल्या भाषणात जगताप यांच्या कार्याचा विशेष गौरव करत पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांचे कार्य संस्थेच्या इतिहासात कायम स्मरणात राहील असे उद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिव डॉ.अशोकराव ज्ञानदेव मोहेकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आबासाहेब बारकुल उपाध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा,प्रा.अंकुशराव पाटील कोषाध्यक्ष ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा,रमेश मोहेकर प्रशासकीय अधिकारी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा, तात्यासाहेब पाटील ज्येष्ठ संचालक ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा,प्रा.डी.एस.जाधव संचालक ज्ञानप्रसार मंडळ येरमाळा,प्रा.वसंतराव मडके संचालक ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा,संस्थेच्या संचालिका सौ.अंजलीताई अशोकराव मोहेकर,सौ.अलकाताई अनिल मोहेकर,सौ.निर्मलाताई रमेश मोहेकर,सौ.उज्वलाताई धनंजय परजणे,प्रा.शेषराव मडके , ह.भ.प अशोक मडके,संजय मडके,माजी उपसरपंच बाबा मडके,चेअरमन हनुमंत मडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य संजय जगताप मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,संस्थेने मला कुटुंब सदस्य म्हणून स्वीकारले आणि या कुटुंबामध्ये काम करणे एक अनमोल अनुभव आहे आणि पुढील काळात ही शैक्षणिक कार्यात काम करतच राहणार असे त्यांनी यावेळी नमूद केले. सर्व सहकारी बंधू आणि भगिनी यांनी मला सहकार्य केले व सत्कार केला त्याबद्दल त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले.या कार्यक्रमांमध्ये कु.श्रावणी वीर, कु.सानिका बारखोते विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,अशोक मडके,संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,डोळस, श्रीमती तांबारे,शुभम जगताप यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास संस्थेतील विविध शाखेतील मुख्याध्यापक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्राचार्य संजय जगताप यांचे स्नेही मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानप्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नवनाथ करंजकर यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश मडके यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.देवदत्त पाटील यांनी मानले.
More Stories
ज्ञान प्रसार प्राथमिक शाळेत नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
ज्ञान प्रसार विद्यालयात गुणवंत शिक्षकांचा सत्कार
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न