धाराशिव (जिमाका)- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीतील त्रैमासिक सभा २८ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.या बैठकीत भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींवर चर्चा होणार आहे. तक्रारी प्रथम तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती किंवा संबंधित विभागाच्या जिल्हा दक्षता समितीकडे द्याव्यात.अपेक्षित कार्यवाही न झाल्यास,त्या तक्रारी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविता येतील. तक्रार अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.प्रत्येक विभागाने जिल्हास्तरीय दक्षता समितीमार्फत तक्रारींचा निपटारा करावा. भ्रष्टाचारासंबंधी पुरावे असल्यास,ते तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समिती किंवा जिल्हा दक्षता समितीकडे सादर करावेत. समितीकडे आलेल्या तक्रारींची ३० दिवसांत चौकशी करून,संबंधित कार्यालयाच्या दक्षता समितीकडे पाठविण्यात येईल.जिल्हा दक्षता समितीने ९० दिवसांत निर्णय घ्यावा व दोषी अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंग कारवाईसाठी अहवाल सादर करावा. ९० दिवसांत कार्यवाही न झाल्यास, तक्रारदार जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे पुराव्यासह तक्रार करू शकतो.तक्रार दाखल करताना,आधीच्या टप्प्यांतील अर्ज व पुराव्यांची प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान