कळंब – बहुजन कर्मचारी अधिकारी महासंघ,धाराशिव तालुका कळंबच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये संघटनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित पुढीलप्रमाणे मान्यवरांची उपस्थिती होती. उपाध्यक्ष डॉ. कांबळे, सरचिटणीस सी.आर.घाडगे, कोषाध्यक्ष मारुती गायकवाड, एपीआय कदम,श्री.माळी,श्री. सतीश कुलकर्णी,कैलास गायके (धारूर),शिवाजी शेळके,गणेश शेळके,रमेश काळे,बालाजी माने, राजाभाऊ पारकर,मेजर हौसलमल,महादेव जगताप, सुरज ट्रेलर,भास्कर सोनवणे, कल्याण करवलकर आणि कैलास जाधव. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला व त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड