धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.22 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 283 कारवाया करुन 2,29,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-तात्या उर्फ विजय महादेव गरड, वय 28 वर्षे, रा. चिकुंद्रा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.22.04.2025 रोजी 19.30 वा. सु.चिकुंद्रा शिवारात शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे अंदाजे 1,250 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे:आरोपी नामे-राम सोपान बनसोडे, वय 51 वर्षे, रा. कनगरा ता. जि. धाराशिव हे दि.22.04.2025 रोजी 17.00 वा. सु.धाराशिव ते उजणी जाणारे रोडलगत महादेववाडी शिवारात अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-लक्ष्मण विठ्ठल लवटे, वय 35 वर्षे, रा.बोरी तामोळा ता.उमरगा जि. धाराशिव हे दि.21.04.2025 रोजी 15.40 वा. सु.प्रभात हॉटेलच्या पाठीमागे रोडवर उमरगा येथे अंदाजे 2,000₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-कासीम मकबुल लदाफ, वय 36 वर्षे, रा.काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.04.2025 रोजी 16.30 वा. सु.भाजी मार्केट उमरगा येथे अंदाजे 6,500₹ किंमतीची 65 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.21.04.2025 रोजी 12.45 ते 15.30वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत 7 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-हुसेन राजअहमद शेख, वय 55 वर्षे,मुन्सी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.40 वा.सु. भाजी मार्केट येथे पत्राचे शेड समोर उमरगा येथे टाईम बाजार मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,440 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-सचिन चंद्रकांत बनसोडे, वय 40 वर्षे, शासकीय झोपडपट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.30 वा.सु. काळे कॉम्पलेक्स समोर उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,370 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-अनिकेत जिवन बिराजदार, वय 27 वर्षे,रा. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.10 वा.सु. याटे कॉम्पलेक्स समोर उमरगा येथे मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 11,250 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-प्रदिप भगवानराव मुसांडे, वय 25 वर्षे,रा. अजय नगर पतंगे रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.30 वा.सु. हॉटेल रविराज समोर उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 11,740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-लक्ष्मण लिंबराज मुगळे, वय 42 वर्षे, रा.नारंगवाडी पुर्व ता.उमरगा जि. धाराशिव हे 14.25 वा.सु. नारंगवाडी पाटीवरील ज्युसचे दुकानाचे बाजूचे पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 740 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-प्रभाकर मारुती मुरमे, वय 76 वर्षे, रा.पंतगे रोड, उमरगा ता.उमरगा जि. धाराशिव हे 12.45 वा.सु. उमरगा येथील पतंगे रोडवरील काळ्या मठाचे बाजूचे पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,190 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-दत्तात्रय नागोराव जमादार, वय 31 वर्षे, रा.झोपडपट्टी उमरगा ता.उमरगा युवराज सौदागर घोडके, वय 52 रा. महात्मा फुले नगर उमरगा ता.उमरगा जि. धाराशिव हे 14.50 वा.सु. प्रभात हॉटेलच्या पाठीमागे मोकळ्या जागेत उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 9,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.22.04.2025 रोजी 14.30 वा. सु. ढोकी पो ठाणे हद्दीत ढोकी पेट्रोलपंप चौक तुळजाभवानी हॉटेलच्या बाजूला ढोकी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजेंद्र दादाराव ढवारे, वय 65 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव हे 14.30 वा.सु. ढोकी पेट्रोलपंप चौक तुळजाभवानी हॉटेलच्या बाजूला ढोकी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-हरी ज्ञानदेव खोचरे, वय 49 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव यांचेअंदाजे15,000₹ किंमतीच्या दोन शेळ्या व पाच कोकरे हे दि. 09.04.2025 रोजी 23.00 ते दि.10.04.2025 रोजी 10.00 वा. सु. जगदंब हॉटेच्या जवळून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हरी खोचरे यांनी दि.22.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-संतोष काशिनाथ चव्हाण, विनोद काशिनाथ चव्हाण, चंम्पाबाई काशिनाथ चव्हाण,तिघे रा. बेळंब तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.04.2025 रोजी 21.30 वा. सु. बेंळब तांडा येथे फिर्यादी नामे- रेश्मा संतोष चव्हाण, वय 29 वर्षे, रा. बेळंब तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकल का घेवून गेलात असे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व लाकडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेश्मा चव्हाण यांनी दि.22.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-भवानीशंकर नागनाथ कनकधर, शभांगी भवानीशंकर कनकधर, श्वेतांबरी भवानीशंकर कनकधर, समर्थ भवानीशंकर कनकधर, सर्व रा. खटकाळ गल्ली, शुक्रवार पेठ, तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.11.04.2025 रोजी 16.30 वा. सु. टिा मेडीकल जवळील फिर्यादीचे चहा नाष्टा हॉटेलसमोर खटकाळ गल्ली तुळजापूर येथे फिर्यादी नामे-लक्ष्मीनारायण उर्फ नितीन नागनाथ कनकधर, वय 44 वर्षे, रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गल्लीत येण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाकुने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लक्ष्मीनारायण उर्फ नितीन कनकधर यांनी दि.22.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
वाशी पोलीस ठाणे: मयत नामे- अनुरुद्र मोहन चौधरी, वय 44 वर्षे, रा. तांदुळवाडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.17.04.2025 रोंजी 21.15 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 25 एआर 6395 वरुन जात होते. दरम्यान वाशी येथील बाजार समितीच्या पुढे तांदुळवाडी कडे जाणारे रोडवर ईदगाह समोर छोटा हत्ती क्र एमएच 25 एजे 7441 चा चालकाने त्याचे ताब्यातील छोटा हत्ती हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून अनुरुद्र चौधरी यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघाता अनुरुद्र चौधरी हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बारीकराव मोहन चौधरी, वय 41 वर्षे, रा. तांदुळवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.22.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे- आशा बळीराम पवार, वय 35 वर्षे, रा. अडवली भुतावली, महापे गाव नवी मुंबई जि. ठाणे व सोबत प्रविण दंडगुले, वय 28 वर्षे, रा. माडज ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.13.04.2025 रोंजी 20.00 वा. सु. ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसून जात होते. दरम्यान उमरगा ते लातुर जाणरे रोडवर एकुरगावाडी गावचे हद्दीमध्ये मुख्य सिमेंट रोडवर महिंद्रा 3 एक्स ओ कारगाडी क्र एमएच 22 बीसी 9597 चा चालक आरोपी नामे- डॉ.घनश्याम शंकर कुह्राडे, रा. राणी सावरगाव ता. गंगाखेड जि. परभणी यांनी त्याचे ताब्यातील कारगाडी ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. या अपघाता आशा पवार व प्रविण दंडगुले हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर आरोपी नामे- डॉ.घनश्याम कुह्राडे हे स्वत: गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम दगडु पवार, वय 40 वर्षे, रा. अडवली भुतावली, महापे गाव नवी मुंबई जि. ठाणे यांनी दि.22.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन