June 21, 2025

ग्रामीण भागात बाल साहित्य संमेलन भरवणे काळाची गरज – बाल साहित्यिक आश्रुबा कोठावळे

  • कळंब – शहरीकरणा बरोबरच ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात बाल साहित्यिक आहेत.यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी साहित्य संमेलन आयोजित करणे काळाची गरज असल्याचे मत बाल साहित्यिक आश्रुबा कोठावळे यांनी भूम येथिल बालकुमार मराठी साहित्य संमेलनात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
    गुरुवार दि.3 एप्रिल 2025 रोजी भूम येथिल जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संस्था पुणे तालुका शाखा भूम व जनसेवा ग्रामीण विकास संस्था उळूप तालुका भूमच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बालकुमार मराठी साहित्य संमेलन आदर्श मुख्याध्यापक तात्यासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले . या साहित्य संमेलनाला भूम, वाशी,कळंब तालुक्यातील बालकुमार साहित्यिकासह ज्येष्ठ साहित्यिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.
    या साहित्य संमेलनात ऊन, वारा,पाऊस,आई,वडील,निसर्ग, शेती अशा वेगवेगळ्या विषयाला हात घालून बाल साहित्यिकानी आपल्या स्वरचित काव्य सादरीकरण करून उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं,या संमेलनातून काव्य वाचन केलेल्या प्रत्येक बालकवीला आयोजकांच्यावतीने सन्मान चिन्ह,सन्मानपत्र व छत्रपती शिवाजी महाराज,राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरित्र असलेल्या पुस्तकांची भेट देण्यात आली .
    याशिवाय प्रथम समता ठाणांबीर,व्दीतीय प्रांजल खैत्रे, तृतीय आकांक्षा थोरात यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन तर समृद्धी म्हेत्रे,मयुरी जाधव व वैष्णवी शेळके यां बालकवींना उत्तेजनार्थ म्हणून सन्मानीत केले .
    बालकुमार मराठी साहित्य संमेलनासाठी मार्गदर्शन म्हणून धर्मदत अरुण अण्णा शाळू महाराज,बाल साहित्यिक आश्रुबा कोठावळे कळंब,ॲड. विलास पवार,कवित्री सौ. संध्याराणी कोल्हे कळंब,जेष्ठ गझलकार शेखर गिरी,सौ.आशा राऊत कवयित्री कळंब,गोकुळ गायकवाड जामखेड यांची उपस्थिती होती.
    साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अलका सपकाळ,नवकवी पत्रकार शंकर खामकर यांच्या बरोबरच आलिम शेख,अंबादास देशपांडे,ह.भ.प अरुण काळे महाराज,श्रीमती अंजली सुतार,हरिदास पंडित, माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख व दत्तात्रय काळे, शितल राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अलका सपकाळ, सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले तर आभार नवकवी शंकर खामकर यांनी मानले.
error: Content is protected !!