धाराशिव – घर घर दिवाळी ह्या कार्यक्रमा अंतर्गत रोटरी क्लब आणि रोटरी सेवा ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या मार्फत ८४ गरजू लोकांना (विशेषतः एकल महिलांना) प्रत्येकी रुपये १०००/- किमतीचा दिवाळी फराळ शिधा आंबेहोळ, घाटंग्री, पाडोळी, शिंगोली व धाराशिव येथे वाटण्यात आला. क्रिएट होप या रोटरी कार्यक्रमाला अनुसरून आपण ह्या थोड्याशा मदतीने त्यांची दिवाळी पण गोड करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष रो.अनार साळुंके, सचिव रो.मीना जिंतूरकर, माजी प्रांतपाल रो.रविन्द्र साळुंके, प्रकल्प प्रमुख रो. रणजित रणदिवे आणि रो.चंदन भडंगे, रो.प्रदीप मुंढे,रो.अभिजीत पवार, कोषाध्यक्ष रो.किरण देशमाने तसेच जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्र रुग्णालय चे कर्मचारी ही उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात