August 9, 2025

साडू भावांचा अपघाती मृत्यू

  • कळंब – कळंब लातूर राज्यमार्गावरील घारगाव येथे दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी शनिवारी सायंकाळी झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला तिघांचा मृत्यू झाला आहे . या मयतापैकी दोघे कळंब शहरात वास्तव्य करत होते तर एक वाकडी (ई ) या गावचे रहिवासी होते .
    याबाबत सविस्तर वृत्त असे की,लातूर कळंब राज्यमार्गावरील घारगाव गावालगत शनिवारी रात्री वाकडी (ई) येथील महादेव गिरी यांच्या दुचाकीचा कळंब येथील भाऊसाहेब गांधले,झुंबर ओव्हाळ यांच्या दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला .
    यात भाऊसाहेब गांधले ( वय ६० ), झुंबर ओव्हाळ (वय ५२) या हल्ली मुक्काम कळंबकर असलेल्या दोघासह वाकडी येथील महादेव गिरी या ३६ वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाला आहे .
    सदर घटना शिराढोण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.असे असले तरी शिराढोण पोलिसांत रविवारी पाच वाजेपर्यंत कोणतीही नोंद झाली नव्हती.पोलिसांना याविषयी माहिती विचारली असता,प्राप्त होवू शकली नाही.
  • ▪️शिक्षक अन् ….यातील मयत भाऊसाहेब गांधले हे सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी आहेत तर झुंबर ओव्हाळ हे इटकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत होते व दै.लोकप्रबोधन व सा.साक्षी पावनज्योत या वृत्तपत्रांचे वाचक होते.
  • ▪️सख्खे साडू…
    अपघातामधील मयत भाऊसाहेब गांधले व झुंबर ओव्हाळ हे सख्खे साडू आहेत. दोघांची मुळ गावं, सद्या वास्तव्य करत असलेल्या कळंब येथे व सासुरवाडी वाकडी (के) येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
  • ▪️स्पेअर्स पार्ट्स आणायला …
    मयत भाऊसाहेब गांधले यांच्या
    नादुरूस्त गाडीचे स्पेअर्स पार्ट्स आणण्यासाठी गांधले व ओव्हाळ हे लातूरला गेले होते. तेथून परतीचा प्रवास करताना त्यांना काळाने गाठले तर वाकडी (ई) येथील महादेव गिरी हे शिराढोण येथून दिवाळीची खरेदी करून गावाकडे जात होते.
  • ▪️मयत झुंबर ओव्हाळ यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे तर मयत भाऊसाहेब गांधले यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.
error: Content is protected !!