August 9, 2025

माजी प्राचार्य क.दि.भगवान यांचे निधन

  • कळंब – कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य क.दि.भगवान (वय ८९) यांचे रविवार दि.६ एप्रिल २०२५ रोजी रात्री छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले.
    १९७० ते १९९६ या कालावधीमध्ये मोहेकर महाविद्यालयाच्या विकासामध्ये माजी प्राचार्य भगवान यांचा अत्यंत महत्वाचा वाटा होता.
    त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
    प्राचार्य कै.क.दि.भगवान हे मराठी विषयाचे गाढे अभ्यासक होते.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी समर्पित केले.मोहेकर महाविद्यालयाच्या प्रगतीत त्यांचे अमूल्य योगदान आहे.त्यांनी शिक्षण संस्थेचा पाया भक्कम करत अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.
    कळंब व परिसरातीलच नाही तर संपूर्ण मराठवाड्याची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. ते प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांचे ते वडील होत.
error: Content is protected !!