August 9, 2025

समाज कल्याणचा ११ एप्रिल रोजी लोकशाही दिन

  • धाराशिव (जिमाका)- समाज कल्याण कार्यालयाशी संबंधित जनतेच्या तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्यासाठी ‘लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येणार आहे.
    त्या अनुषंगाने ११ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांच्या कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
    जिल्ह्यातील सर्व नागरिक,लाभार्थी, समाजसेवक आणि कार्यकर्ते यांनी समाज कल्याण विभागाशी संबंधित आपल्या तक्रारी,निवेदने किंवा शंका असल्यास या लोकशाही दिनामध्ये उपस्थित राहावे,असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.
error: Content is protected !!