कळंब – आज हिंदू नववर्ष गुढी पाडवा या सणाच्या शुभ मुहूर्तावर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा ता कळंब जिल्हा धाराशिव येथे शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ च्या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रवेशित करण्यात आले.शाळेतील सर्व मुलांची प्रभातफेरी गावातुन काढण्यात आली.आपली मुले शाळेत पाठवा,ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा,गुढी पाडवा प्रवेश वाढवा,साक्षर जनता भुषण भारता,यांसारख्या घोषणांनी गाव परीसर दुमदुमून गेला. मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष,शिक्षणाधिकारी अशोकराव पाटील आणि गट शिक्षणाधिकारी,धर्मराज काळमाते,विस्ताराधिकारी श्रीमती मैनाबाई मुळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या फेरीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गावातील प्रवेश पात्र नऊ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला मुलांना पुष्पहार,साखरेचा हार घालून औक्षण करून सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाचे राज्य सरचिटणीस संतोष भोजने,उपक्रम शील शिक्षक हनुमंत रामभाऊ घाडगे,श्रीमती भारती सूर्यवंशी, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कुमारी मंजुश्री कराड, अंगणवाडी ताई शालिनी सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी