June 19, 2025

नवोदय प्रवेश पात्र परीक्षेत जि.प.प्रा.शाळा देवळालीचे यश

  • कळंब – तालुक्यातील जि.प.प्रा.शा.देवळाली या शाळेचा विध्यार्थी
    कुमार शिवप्रसाद आश्रुबा बिक्कड हा जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र परीक्षा यशस्वी रित्या उत्तीर्ण झाला असून नवोदय विद्यालय तुळजापूर येथे त्याची निवड झाली आहे.या निमित्ताने शाळेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकाचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यालय देवळाली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अविनाश भानवसे सरपंच,अजित पाटील उपसरपंच,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम लोमटे, उपाध्यक्ष गणेश लोमटे, शिक्षण प्रेमी नागरिक व्यंकट माळी, नवनाथ साठे, सिंधुताई घाडगे इ.उपस्थित होते.
    जि.प.प्रा.शा.देवळाली येथील उज्वल यशाची परंपरा कायम राखली गेली.या घवघवीत यशामुळे विद्यार्थ्यासह शाळेचे ही सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
    गेल्या काही वर्षांपासून देवळाली जि.प.शाळेचे अनेक विधार्थी नवोदय, शिष्यवृत्ती,एम.टी.एस. तसेच मंथन टॅलेंट सर्च या सारख्या परीक्षेत चमकले असून ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयीची गोडी लावण्यात या शाळेतील होतकरू शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सिंहाचा वाटा आहे.शाळेतील सर्व शिक्षकांनी गुणवतेत सातत्य राखल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
error: Content is protected !!