कळंब- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे आयोजित दर्जेदार शैक्षणिक साहित्य व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख नवोपक्रमशील सहशिक्षक सोपान पवार यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.त्यांनी इयत्ता नववी,दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा मराठी या विषयात ‘ मराठी लेखनात विरामचिन्हाचा योग्य त्या ठिकाणी वापर ‘ यासाठी शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली होती. या स्पर्धेत त्यांनी तालुकास्तर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,डायटचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे,शिक्षणाधिकारी अशोक पाटील,डायट अधिव्याख्याता डॉ. अंजली सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी धर्मराज काळमाते यांच्या हस्ते पारितोषिक,प्रमाणपत्र देऊन सोपान पवार यांना सन्मानित करण्यात आले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी