कळंब – दिव्यांग कल्याण विभाग,दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे,क्रीडा संचालनालय व स्व.प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था,नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन रेशीमबाग मैदान,नागपूर येथे दिनांक 21 मार्च ते 23 मार्च 2025 दरम्यान करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते झाले.यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री नागपूर चंद्रशेखर बावनकुळे,आशिष जयस्वाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगाव संचलित संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब जि.धाराशिव येथील विद्यार्थिनी कु.तेजस्विनी प्रदीप चवरे हिने वयोगट १७ ते २१ मध्ये २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात धाराशिवचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांक मिळवला.
सर्व विजेत्या खेळाडूंना प्रवीण पुरी (आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य,पुणे) प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख,भारत कांबळे, (निरीक्षक(रा.)दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे) तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी धाराशिव सुनिलजी खमितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता,सच्चिदानंद बांगर,संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण आणि मुख्याध्यापक बालाजी जाधवर यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षिका श्रीमती.सुनंदा गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या यशामुळे विध्यार्थ्यामध्ये खेळाविषयीचा उत्साह वाढला असून,त्यांच्या जिद्दीने संपूर्ण संस्थेला अभिमान वाटत आहे. हा विजय केवळ पदकांचा नसून, त्यांच्या आत्मविश्वास प्रबळ इच्छा शक्तीचा आहे.
More Stories
सावित्रीबाई फुले विद्यालयात योग दिन साजरा
योगा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली – ॲड.सुरेश कुलकर्णी
पाथर्डी शाळेत योग दिवस उत्साहात साजरा