धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.25 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 188 कारवाया करुन 36,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-बालाजी कुंडलिक कांबळे, वय 55 वर्षे, रा.कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.25.03.2025 रोजी 13.50 वा. सु. भिमनगर कानेगाव येथे अंदाजे 1,440 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
परंडा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान परंडा पोलीसांनी दि.25.03.2025 रोजी 17.30 वा. सु. परंडा पो ठाणे हद्दीत जवळा निजाम गावात कुमार भागवत गवारे यांचे पत्र्याचे शेडसमोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बालाजी ज्ञानोबा सुरवसे, वय 50 वर्षे, कुमार भागवत गवारे, वय 52 वर्षे,नानासाहेब दत्तु कातुरे, वय 42 वर्षे, आश्रु भगवान गवारे, वय 45 वर्षे, दत्ता सोमा सांगळे, वय 35 वर्षे, फुलचंद शंकर चव्हाण, वय 35 वर्षे, रा. जवळा निजाम ता. परंडा जि. धाराशिव हे 17.30 वा.सु. जवळा निजाम गावात कुमार भागवत गवारे यांचे पत्र्याचे शेडसमोर तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले परंडा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“दरोड्याची तयारी आसणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे- बबलु उर्फ राहुल अर्जुन काळे, वय 28 वर्षे, धनाजी सुरेश शिंदे, वय 21 वर्षे, दोघे रा. खामसवाडी ता. वाशी जि. धाराशिव, संजय काळे, संजय काळे यांचा मेहुना बबलु इतर एक रा. खामकरवाडी ता. वाशी हे दि. 24.03.2025 रोजी 21.10वा. सु. सीड फॉर्ममध्ये जाण्याऱ्या कच्चा रोडलगत सोनालिका ट्रॅक्टर रुमचे बांधकामालगत दुधाळवाडी पाटी येथे दरोड टाकण्याचे उद्देशाने एकत्र येवून दरोड्याचे तयारीनीशी एक लोखंडी कटावणी, कोयता, लोखंडी जॅक, स्क्रु ड्रायव्हर, एक पोको कंपनीचा मोबाईल फोन, बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्र एमएच 25 बीसी 7759 असा एकुण 98,800₹किंमतीचे सामान कब्जात बाळगलेले येरमाळा पोलीसांना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सागर वसंतराव कांबळे, पोलीस अंमलदार नेमणुक पोलीस ठाणे येरमाळा यांनी दि.25.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310(4), 310(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बापु अरुण चव्हाण, वय 30 वर्षे, रा.तेलेवाडी ता. केज जि. बीड यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची एक काळ्या रंगाची हिरो स्पेलंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 44 पी 2059 ही दि.24.03.2025 रोजी 09.30 ते 10.30 वा. सु.जिल्हा परिषद शाळा कळंब येथील परिसरातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बापु चव्हाण यांनी दि.25.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-नागेश सुधाकर भंरगडे, वय 32 वर्षे, रा.येवती ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे किराणा दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 24.03.2025 रोजी 03.00 वा. सु. ते दि.25.03.2025 रोजी 04.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन किरणा सामान व रोख रक्कम 23,000₹ असा एकुण 40,832 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागेश भंरगडे यांनी दि.25.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 334(4),305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-आनंद दयानंद वाघमारे, मनोज शाम शिंदे, अतिश आकाश शिंदे,अमित अनंत वाघमारे,तालीब महेबुब शेख, ऋषीकेश रवी रनशिंगारे, मुकेश उर्फ दादा शाम शिंदे, सर्व रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यांनी दि.20.03.2025 रोजी 10.30 वा. सु. शांताई हॉटेल शिंगोली शिवार धाराशिव येथे फिर्यादी नामे-राजकुमार अच्युत वाघमारे, वय 35 वर्षे, रा. शिंगोली ता.जि.धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता व काचेची बिअरची बॉटलने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजकुमार वाघमारे यांनी दि.25.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 118(1),115(2), 352, 351(2) (3), 189(2),191(2), 191(3),190 सह मपोका कलम 37(1)(3), 135 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-बळीराम विठ्ठल जाधव, वय 30 वर्षे, रा. उजळंब ता. बसवकल्याण जि. बिदर ह.मु. त्रिमुर्ती स्टाईल उमरगा हे दि.17.03.2025 रोजी 22.00 वा.सु. एमएच 14 सी आर 6770 वरुन जात होते. दरम्यान चौरस्ता उमरगाचे अलीकडे 100 मिटर अंतरावर मोटरसायकल क्र एमएच 25 ए झेड 6817 च्या चालकाने त्याचे त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून बळीराम जाधव यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात बळीराम जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेखा विठ्ठल जाधव, वय 50 वर्षे, रा. उजळंब ता. बसवकल्याण जि. बिदर ह.मु. त्रिमुर्ती स्टाईल उमरगा यांनी दि.25.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए),125(बी), 106(1) सह 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे: मयत नामे-शिवाजी दुर्गाप्पा दंडगुले, वय 36 वर्षे, रा. जेवळी दक्षिण ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.22.03.2025 रोजी 07.00 वा.सु. एमएच 25 बी बी 0561 वरुन लोहारा येथुन जेवळी येथे जात होते. दरम्यान जेवळी उत्तर गावाजवळ दादाराव थोरात यांचे शेताजवळ रोडवर मोटरसायकल क्र एमएच 14 ए.जे.7917 च्या चालक आरोपी नामे- सोमनाथ अंकुश निंगशेट्टी रा. फणेपुर ता.लोहारा जि. धाराशिव यांनी त्याचे त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून शिवाजी दंडगुले यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात शिवाजी दंडगुले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल शिवाजी दंडगुले, वय 36 वर्षे, रा. जेवळी दक्षिण ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.25.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए),125(बी), 106(1) सह 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात,आमदारानी दिला शेतकऱ्यांना आधार
दर्जेदार शिक्षण,उत्कृष्ट जेवण आणि उत्तम राहण्याची व्यवस्था – अरुण घोगरे
मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने पृथ्वीराज चिलवंत यांचा वाढदिवस साजरा