August 9, 2025

असाक्षरांची परीक्षा २३ मार्च रोजी

  • धाराशिव (जिमाका)- केंद्र पुरस्कृत “उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) संपूर्ण देशभर २३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या प्रत्येक शाळेचे केंद्र असणार आहे.
    ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि ती एकूण ३ तासांची व १५० गुणांची असेल.त्यामध्ये ५० गुण वाचन,५० गुण लेखन आणि ५० गुण संख्याज्ञानासाठी असतील.धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये या परीक्षेसाठी एकूण ११ हजार ४३५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
    तालुकानिहाय विद्यार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे – भूम (९७१), धाराशिव (१८४०), कळंब (१७४३),लोहारा (१०३५),उमरगा (२०४५), परांडा (७१७), तुळजापूर (१६५४) आणि वाशी (१४३०).
    ही परीक्षा १५ वर्षापुढील असाक्षर व्यक्तींसाठी मूलभूत साक्षरता आणि गणितीय क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी घेण्यात येणार असून,त्यातून शैक्षणिक स्तर उंचावण्यास मदत होईल.
    या परीक्षेत नोंदवलेल्या जास्तीत जास्त असाक्षरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा नियमक समिती अध्यक्ष कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यकारी समिती अध्यक्ष डॉ.मैनाक घोष,शिक्षणाधिकारी (योजना) सुधा साळुंके, शिक्षणाधिकारी (प्राथ.)अशोक पाटील, उपशिक्षणाधिकारी (योजना) संतोष माळी यांनी केले आहे.
error: Content is protected !!