धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यात रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर १९ मार्च २०२५ रोजी मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून सार्वजनिक शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या (लायसन्स) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरोधात कठोर कारवाई केली जाईल. महाराष्ट्र दारूबंदी कायदा,१९४९ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार संबंधितांचे अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आदेशात नमूद केले आहे.
More Stories
ई-पीक पाहणीची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत;शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करून घ्यावी
जनगणना २०२७ ची तयारी ३७३१ कर्मचारी सज्ज
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल