June 23, 2025

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने शिक्षक प्रशिक्षणाचा दर्जा राखला – प्राचार्या डॉ.भगिरथी गिरी

  • कळंब – २०१२ पासून अध्यापक विद्यालयांच्या प्रवेशाला व इतर शैक्षणिक बाबींना ओहोटी लागली होती.मात्र त्या कठीण परिस्थितीतही प्रवेश सुनिश्चित करून भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली,असे प्रतिपादन मुरुड डाएटच्या प्राचार्या तथा अध्यापक विद्यालय तपासणी समितीच्या प्रमुख डॉ.भगिरथी गिरी यांनी केले.त्या शिक्षक क्षमता वृद्धी सेवांतर्गत प्रशिक्षण समारोप व भैरवनाथ अध्यापक विद्यालय तपासणी प्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
  • यावेळी भैरवनाथ अध्यापक विद्यालयात क्षमता वृद्धी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील होते. व्यासपीठावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडचे ज्येष्ठ अधिव्याख्याता जयपाल कांबळे, अधिव्याख्याता घनश्याम पौळ, तंत्रज्ञ श्री.लांडगे,शिक्षक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,शिक्षण विस्तार अधिकारी संभाजी जगदाळे,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने,प्रशांत घुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
    डॉ.भगिरथी गिरी यांनी भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या सेवाभावी योगदानाचे कौतुक करताना सांगितले की, “शिक्षण प्रक्रियेत राज्याच्या शिक्षण सचिवापासून ते विद्यार्थ्यापर्यंत प्रत्येक घटक हा महत्त्वाचा आणि जबाबदार असतो.भविष्यात अध्यापक विद्यालय प्रवेशासाठी मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे भैरवनाथ अध्यापक विद्यालयाने गुणवत्ता टिकवावी आणि आणखी उंची गाठावी.”
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सतीश मातने यांनी करताना २००७ पासूनच्या विद्यालयाच्या प्रवासाचा आढावा घेतला तसेच विविध क्षेत्रात चमकलेले माजी विद्यार्थी यांचा नामोल्लेख केला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले,तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी मानले.
    या कार्यक्रमास वेद शैक्षणिक संकुलातील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी शिक्षकांची लक्षणीय उपस्थिती होती.
error: Content is protected !!