धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.14मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 379 कारवाया करुन 3,29,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-बानु बाबु पवार, रा. पळसप ता. जि. धाराशिव हे दि.14.03.2025 रोजी 14.00 वा. सु. पळसप पारधी पिढी येथे अंदाजे 7,200 ₹ किंमतीची 90 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-लक्ष्मी कालीदास पवार, रा. तेर ता.जि. धाराशिव या दि.14.03.2025 रोजी 16.30 वा. सु.आपल्या पत्र्याचे शेड समोर तेर येथे अंदाजे 21,575 ₹ किंमतीच्या देशी विदेशी 45 सिलबंद बाटल्या 200 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-किशोर भगवान वाघमारे,रा. दाउतपुर ता.जि. धाराशिव हे दि.14.03.2025 रोजी 17.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 10,725 ₹ किंमतीची 25 लिटर गावठी दारु व 77 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-योगेश लक्ष्मण चौधरी, वय 34 वर्षे, दाबका ता. उमरगा ह.मु. औराद ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.14.03.2025 रोजी 17.45 वा. सु विश्वनाथ सुरवसे यांचे शेतात पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 30 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
भुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-अनिता अभिमान पवार, वय 38 वर्षे, रा. इंदीरानगर ता. भुम जि. धाराशिव हे दि.14.03.2025 रोजी 17.15 वा. सु. आठवडी बाजार येथे न.पा. भुम गाळ्यासमोर अंदाजे 2,200 ₹ किंमतीची 22 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-अमीन झरुद्दीन इनामदार, वय 35 वर्षे, रा. आनंदनगर मुरुम, अजय शेषेराव नागराळे, वय 24 वर्षे, रा. आरोग्यनगर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.14.03.2025 रोजी 16.45 ते 17.45 वा. सु. आपपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम1813 व रिक्षा क्र एमएच 25 ए के 1917 ही मुरुम येथे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय समोर रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-मोहन श्रीरंग कांबळे, वय 52 वर्षे, रा. शास्त्रीनगर औटी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.14.03.2025 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एके 0839 हा आरोग्य नगरी कॉर्नर येथे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-जमीर सरदार फकीर, वय 44 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव, सतिषकुमार सिद्राम मोटे, वय 40 ववीर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.14.03.2025 रोजी 19.30 वा. सु. आपपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 23 एच 0737 व बोलेरो क्र एमएच एन 9883 ही लोहारा येथे लोहारा ते कास्ती रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-मतीन ख्वॉजा कुरेशी रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.14.03.2025 रोजी 03.30 वा.सु.माणकेश्वर ग्रामपंचायतीचे पाठीमागे गोवंशीय जातीचे 1 गाय, 4 वासरे, एकुण 80,000₹ किंमतीचे जनावरे त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दयतेने कत्तलीसाठी बेकायदेशीर रित्या बांधून ठेवलेले परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1)(च), (ज)(झ) सह 119 म.पो.अधि. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ अग्निशस्त्र जवळ बाळगून दरोड्याची तयारी करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- सचिन नवनाथ इतापे, तुषार भारत शिंदे, रा. लोणी ता. परंडा, सुजित लक्ष्मण पवार, रा. भोत्रा ता. परंडा, वैभव गोरख कोडलिंगे रा. शेंद्री ता. बार्शी, चैतन्य पांडुरंग शेळके रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव हे दि. 14.03.2025 रोजी 03.00 वा. सु. परंडा ते देवगाव जाणाऱ्या रोडवर दिपक केरबा गरड यांचे परंडा कात्राबाद असलेल्या शेताजवळ दरोड टाकण्याचे उद्देशाने एकत्र येवून दरोड्याचे तयारीनीशी एक सिल्वर रंगाचे गावठी पिस्टल अंदाजे 10,000₹ किंमतीचे एक पितळी जिवंत राउंड दोन लोखंड कत्ती कब्जात बाळगलेले परंडा पोलीसांना मिळून आले. हद्दपार आदेशाचे उल्लघंन केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नितीन प्रकाशराव गुंडाळे, वय 39 वर्षे, ने पोलीस ठाणे परंडा यांनी दि.14.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310(4), 310(5), सह 3, 4 ,25 शास्त्र अधिनियम सह म.पो.अधि कलम 56 (अ)/142 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-चेतन छत्रभुज भवर, वय 40 वर्षे, रा.कसबा पेठ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे बिपीएड कॉलेज परीळ रोड कळंब येथील हॉलमधील सोयाबीनचे 150 कट्टे 2,70,000₹ किंमतीचे दि. 20.10.2024 रोजी 15.00 ते दि. 13.03.2025 रोजी 20.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-चेतन भवर यांनी दि.14.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रदीप भास्कर चालुक्य, वय 67 वर्षे, रा. रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची लाडा लक्ष्मी कंपनीची 7-5 एच पी ची पाणबुडी व स्टार्टर हे दि. 11.03.2025 रोजी 23.00 ते दि. 12.03.2025 रोजी 06.00 वा. सु. अजित चालुक्य यांचे शेतात दाबका शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रदीप चालुक्य यांनी दि.14.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-भाउसाहेब हरिदास सरडे, प्रदिप हरीदास सरडे, रमेश बब्रुवान नन्नवरे, साईराज रमेश नन्नवरे, दिलीप बब्रुवान नन्नवरे, रा. सरडेवाडी ता. तुळजापूर, प्रशांत तांबे, रा. कुंभारी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 14.03.2025 रोजी 14.30 ते 14.45 वा. सु.बालाजी वसंत धुरगुडे यांचे दुकानासमोर सरडेवाडी गावात येथे फिर्यादी नामे-शुभम जयकुमार धुरगुडे, वय 25 वर्षे, रा. सरडेवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने,लोखंडी कत्ती, वेळूची काठी, कुह्राडीचा दांडा, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शुभम धुरगुडे यांनी दि.14.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 191(3), 190,118(2), 118(1), 115(2), 352, 351(3)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-रत्नदीप शिवाजी चव्हाण,पवन शिवाजी चव्हाण, भाउसाहेब वसंत चव्हाण, अतुल लक्ष्मण चव्हाण, प्रसाद मोतीराम चव्हाण, सर्व रा.वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 14.03.2025 रोजी 20.00 वा. सु.वाल्हा येथे फिर्यादी नामे-दत्ता आप्पासाहेब शेळवने, वय 23 वर्षे, रा.वाल्हा ता. भुम जि. धाराशिव यांना व त्यांचे आई वडील यांना नमुद आरोपींनी तु माझ्या कडे बघून का हासला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्ता शेळवने यांनी दि.14.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 190, 115(2), 352, 351(2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-थ्व्कास् गेमु राठोड, किशोर विश्वनाथ चव्हाण, अभिषेक वामन राठोड, अभिषेक दिलीप राठोड, सुजित देविदास जाधव, ओमकार जिवन जाधव, अर्जुन चव्हाण सर्व रा. मुळज तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 13.03.2025 रोजी 19.00 वा. सु.मुळज तांडा येथे फिर्यादी नामे-गोपीचंद सिताराम राठोड, वय 37 वर्षे, रा.कराळी तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांचा चुलत भाउ दिनेश राठोड यांना नमुद आरोपींनी तु आमच्या चाड्या तुळशीराम चव्हाणला का सांगतो या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, हंटर केबलने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोपीचंद राठोड यांनी दि.14.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2),191(3), 190,118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे- छोटू कुमार शर्मा, वय 20 वर्षे, रा. कुसमोरु ता. बरगमा जि. आरसिया, बिहार हे दि.05.03.2025 रोजी 19.15 वा.सु. मोटरसायकल क्र पीबी 11 झेड 3930 वरुन बलसुर ते उमरगा रोडवरुन जात होते. दरम्यान हार्वेस्टर वाहन क्र पीबी 11 डीएच 4579 चालक आरोपी नामे- अशीश अकलु शर्मा रा. कुसमोरु ता. बरगामा जि. आरसिया, बिहार यांनी त्याचे ताब्यातील हार्वेस्टर हे हायगयी व निष्काळजीपणे चालवून छोटू शर्मा यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात छोटू कुमार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बळीराम नवनाथ सोनटक्के, नेमणुक पोलीस ठाणे उमरगा यांनी दि.14.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब), 106(1), सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी