कळंब – लेजंड ग्रुपतर्फे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संस्थापक,अध्यक्ष माजी नगरसेवक अमर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत विशेष समिती स्थापन करण्यात आली असून,जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.या मिरवणुकीद्वारे समाजात एकता,बंधुता आणि समता यांचे संदेश देण्याचा उद्देश आहे. यावेळी सर्वानुमते पुढीलप्रमाणे कमिटी घोषित करण्यात आली. सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष रोहित हौसलमल, उपाधक्ष महेश देढे,कोषाध्यक्ष प्रेम हौसलमल,मिरवणूक प्रमुख लखन गायकवाड,रोशन हौसलमल,अमित गायकवाड, गुड्डू गांजीकर यांची निवड करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.मिरवणुकीत डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित झांज्या,पथनाट्ये आणि घोषवाक्यांद्वारे त्यांच्या विचारांचे प्रसार करण्यात येईल. यावेळी लेजंड ग्रुपच्या संस्थापक, अध्यक्ष अमर गायकवाड म्हणाले की,”डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी तरुण पिढीला प्रेरित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.” प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन,समानता आणि न्यायासाठीचा त्यांचा संघर्ष पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील,हेच या भव्य मिरवणुकीचे मुख्य ध्येय आहे. या समितीचे मार्गदर्शक आनंद मोहेकर,गणेश शेवते,रमजान शेख,लिजेंड ग्रूप चे संस्थापक अध्यक्ष अमर गायकवाड , उपाध्यक्ष विशाल गायकवाड यांनी प्रस्तावना केली तर आभार नितीन हौसलमल यांनी मानले.या कार्यक्रमासाठी स्थानिक नागरिक,सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा उत्सव केवळ आनंदाचा नाही, तर सामाजिक जागरूकतेचा आणि एकतेचा प्रतीक ठरेल.असे आवाहन करण्यात आले आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात