कळंब – कळंब येथील मोमीन गल्लीतील रहिवासी जुनेद शेख यांची कन्या,अवघ्या तीन वर्षांची इशरा जुनेद शेख हिने आपल्या जीवनातील पहिला रमजान उपवास पूर्ण करून कौतुकास्पद उदाहरण घडवले आहे. रमजान हा इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात उपवास (रोजा) ठेवण्याची प्रथा आहे,जी वयात आलेल्या मुस्लिम बांधवांसाठी बंधनकारक असते. मात्र,लहान वयातील इशराने स्वतःहून उपवास करण्याची इच्छा व्यक्त करत पूर्ण दिवस उपवास पूर्ण केला. इशराच्या या धैर्याने आणि श्रद्धेने तिच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक प्रभावित झाले आहेत. कुटुंबीयांनी आनंद व्यक्त करत सांगितले की,इशराची ही भक्ती आणि आत्मशिस्त समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. या खास प्रसंगी कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी इशराचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात