September 24, 2026

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे

  • कळंब – कळंब तालुक्यातील इटकुर येथिल बौद्ध बांधवांनी दि.८/३/२०२५ रोजी कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांना निवेदन देण्यात आले. या मध्ये प्रमुख मागणी बिहार येथिल महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी विहाराला सदरील कायद्यान्वये मंदिर असा उल्लेख करण्यात आला आहे.बुद्ध गया येथील बुद्ध गया मंदिर कायदा – १९४९ रद्द करून महाबोधी महाविहाराचा ताबा फक्त बौद्धांनाच द्यावा अशा विनंतीच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या परिवर्तन विचार मंचांचे तुकाराम शिंदे, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे समंत बंधू सुरेश लोंढे,आशोक सावंत सर,अमोल रणदिवे,ग्रामपंचायत सदस्या रेखाताई शिंदे,महानंदा लोंढे,प्रेमकुमार शिंदे,मुकुंद शिंदे, बाळासाहेब ओव्हाळ,भरत गुडे,पल्लवी लोंढे यांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.या वेळी ईटकूर येथील अनेक बौध्द बांधव उपस्थित होते.
error: Content is protected !!