June 22, 2025

लसाकमच्या वतीने सेवानिवृत्त प्रा.राजाराम माळी यांचा सत्कार

  • कळंब – कळंब येथे लसाकम शाखा कळंबच्या वतीने दि.४ मार्च २०२५ रोजी साविञीबाई फुले माध्य व उच्चमाध्यमिक विद्यालयातील प्रा.राजाराम सिताराम माळी यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.माळी यांचे शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात भरीव असे कार्य आहे.सर्व क्षेत्रामध्ये त्यांचा मित्रपरिवार आहे.विद्यार्थ्यांना ते तळमळीने अध्यापनाचे कार्य करत.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बी.एन.भंडारे होते.तर प्रमुख पाहुणे सुरेश धावारे होते.
    प्रास्ताविकेत लसाकम तालुकाध्यक्ष दिलीप मोरे यांनी आर.एस.माळी यांच्या कार्याचा परीचय करुन दिला.त्यांनी सामाजिक व शैक्षणिक सेवेची ३२ वर्षे पुर्ण केली. त्याबद्दल गुणगौरव करताना सांगितले की, आज पर्यंतचा त्यांच्या कार्याचा आढावा घेतला असता.विद्यार्थि प्रिय व मानवतावादी शिक्षक त्यांच्या कार्यातुन दिसतात. म. फुलेनी सांगीतलेल्या विचाराप्रमाणे’ आधी केले मग सांगीतले ,’तसे माळीसर विद्यार्थ्यांच्या व मिञपरीवाराच्या सुख दु:खात सहभागी होणारे असे व्यक्तिमत्व आहे. पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा उपस्थित सुरेश धावारे, सोमनाथ कसबे,बापु भंडारे यांनी माळी यांच्या कार्याचा मनोगतातुन गुणगौरव केला. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना माळी सरांनी हा सत्कार सामाजिक संघटनेकडुन होत आहे याचा मला अतिशय आनंद होतो.अशी कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप केला.कार्यक्रमाचे सुञसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार बाळासाहेब कांबळे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.कल्याण लोंढे,विक्रम भंडारे व भालेराव व इतर मित्रजन उपस्थित होते.
error: Content is protected !!