कळंब – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाची संधी मिळावी या उदात्त हेतूने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी संत नामदेवाच्या “ज्ञानदीप लावू जगी” या ऊक्तीप्रमाणे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाच्या माध्यमातून सन १९५१ ला मोहा येथे वटवृक्षरुपी शाळेची स्थापना करून समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शिक्षणाच्या महत्त्वाची जाण ठेवून,विशेषतःआर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.त्यांनी स्थापन केलेल्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,गुणवत्तापूर्ण शिक्षण, आणि सर्वसमावेशक विकासावर भर दिला जातो. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील मुलांना मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या संधींप्रमाणेच शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेत नाहीत, तर कला,क्रीडा,आणि व्यक्तिमत्व विकासासाठीही मार्गदर्शन मिळवतात. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या अथक प्रयत्नांमुळे शेकडो विद्यार्थी यशस्वी झाले असून,समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल समाजात सर्वत्र त्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेली प्रेरणादायी चळवळ पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने दि.६ मार्च २०२५ वार गुरुवार रोजी मराठवाड्यातील विविध ठिकाणी गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
संभाजी विद्यालय,पिंपळगाव (लिंगी) ता.वाशी येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( आण्णा ) यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे सहशिक्षक बोडके एस. एम.यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत तसेच सहाय्यक शिक्षक संतोष बोडके,सुहास जगताप,सुनिल बावकर शिक्षकेत्तर शिवराम शिंदे ,लहू फुरडे आदी उपस्थित होते.
आदरणीय शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,शिक्षकेत्तर सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी विद्या मंदिरातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
जय भवानी विद्यालय पारा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी हायस्कूलमध्ये सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे