September 24, 2026

धाराशिव येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

  • धाराशिव – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,धाराशिव व नगर वाचनालय धाराशिव यांचे संयुक्त विद्यामाने नगर वाचनालय धाराशिव येथे मराठी भाषा गौरव दिन दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विजय गायकवाड साहित्यीक महाराष्ट्र शासन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त यांनी केले.उद्घाटन प्रसंगी बोलत असताना त्यांनी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्य विषयी माहिती सांगितली तसेच कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या आहे आणि नाही व प्रतिसाद लघुनिबंध संग्रह या निबंध संग्रह वर माहिती दिली. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.निंबाळकर सतीश शिवाजी यांनी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या कविते विषय माहिती सांगून मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हनुमान ढाकणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी,धाराशिव यांनी भूषविले.आपल्या अध्यक्ष भाषणात समग्र कुसुमाग्रज यांच्याविषयी तसेच महाराष्ट्र शासन मराठी भाषेच्या वाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नाबद्दल माहिती दिली. यावेळी उपस्थित साहित्यिक सोमनाथ बेलुरे,सुयोग जोशी, ग्रंथपाल,नगर वाचनालय, धाराशिव.विजय वाघमारे, उषापनढवळे,डी.के.शेख, याकुबपठाण,महानंदा मसने इत्यादींची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन मो.ना.तावडे, मुख्य लिपिक जिल्हा ग्रंथालय कार्यलय,धाराशिव यांनी केले.
error: Content is protected !!