खोंदला – महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड्स संस्था तर्फे राज्य प्रशिक्षण केंद्र लातूर येथे दिनांक १४ डिसेंबर तेच १७ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केलेल्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये श्री शरदचंद्रजी पवार विद्यालय खोंदला येथील तीन गाईड ना राज्य पुरस्कार मिळाला. तनिष्का शिवाजी उबाळे,शितल हिम्मत शिंदे,समीक्षा धनंजय शिंदे यांना शाळेच्या मुख्याध्यापिका तथा गाईड कॅप्टन श्रीम.संगीता धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाईड्स ना राज्य पुरस्कार प्राप्त झाला.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगीता धाबेकर,सहशिक्षक श्री महादेव भोंडवे,दीपक राऊत,रोहिदास सर्जेराव,गोविंद चव्हाण यांनी गाईडचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी