धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो.यामुळे येथे प्रचंड काम करणयाची गरज होती.अतिशय गुंतागुंतीच्या परिस्थितीतही सकारात्मक काम करत राहिलो,केलेल्या कामाचे समाधान आणि आनंद असल्याचे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.सचिन ओंबासे यांनी केले. दि.२५ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठ डॉ.ओंबासे यांच्या पत्नी अस्मिता ओंबासे,आई-वडील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, प्र.जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी प्रकाश आहेरराव,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,उदयसिंह भोसले,संतोष राऊत,संतोष भोर,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील व गणेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.ओंबासे म्हणाले की,विविध विभागात काम करण्याची संधी अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने मिळाली.श्री तुळजाभवानी मातेची सेवा करण्याची संधीही मिळाल्याचे भाग्य लाभले.जिल्ह्यात महसुलचे मजबुतीकरण करणे, कर्मचार्यांच्या समस्या तसेच गाव तेथे स्मशानभुमी,आरोग्य संस्थांसाठी जागेच्या प्रश्नांसह त्यांचे बळकटीकरण, तुळजाभवानी मातेच्या मंदीर आणि परिसराचा विकास आराखडा,फेरफार निकाली काढण्यात लागणार कमी कालावधी यासारखी कामे केल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी यावेळी आपल्या मनोगतात सांगितले. या निरोप समारंभाला जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले,जिल्हा महिला व बालविकास कार्यक्रम अधिकारी देवदत्त गिरी,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश बारगजे,सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला,जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हारनाळे, रोजगार कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त संजय गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजपत्रित अधिकारी तहसीलदार,नायब तहसीलदार संघटना,महसुल कर्मचारी संघटना,ग्राम महसुल अधिकारी संघटना,जिल्हा महसुल सेवक संघटना,चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना,जिल्हा परिषद,नगर विकास शाखा,जिल्हा उद्योग केंद्र,लीड बँक,जिल्हा नियोजन समिती, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग आदी संघटनांच्या वतीने डॉ.ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव व संतोष भोर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,उमरगा उपविभागीय अधिकारी गणेश पवार,तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे,कळंबचे तहसीलदार ठोंबरे,ग्राम महसुल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विशाल खळदकर,सोमनाथ गवळी,मंडळ अधिकारी श्री.नागटिळक आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी केले.सुत्रसंचालन धाराशिव तहसिलदार डॉ.मृणाल जाधव यांनी तर आभार तहसीलदार (महसूल) अभिजीत जगताप यांनी मानले.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन