आई हा शब्दच मुळात प्रेम, वात्सल्य आणि समर्पण यांचे प्रतीक आहे.कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात आईचे स्थान हे अनन्यसाधारण असते. ज्या घरात वडिलांची उणीव असते,तिथे आई केवळ आईच नसते तर वडिलांची भूमिकाही निभावत असते.तिचे समर्पण, तिचा संघर्ष आणि तिचे कष्ट पाहिले,की जाणवते – खरोखरच,आईमुळेच आण्णांची उणीव भरून निघू शकते. वडील घराचा आधारस्तंभ असतो,हे सत्य आहे.पण कधी कधी नियतीच्या क्रूरतेने किंवा जीवनातील कठीण प्रसंगांमुळे घरातून वडिलांचा आधार निघून जातो.अशा वेळी आई हा संपूर्ण संसार आपल्या खांद्यावर उचलते.आई एकाच वेळी कुटुंबासाठी जगते,संसाराची जबाबदारी पार पाडते,मुलांच्या गरजा पूर्ण करते,त्यांचं शिक्षण, भविष्य घडवण्याचं काम करते आणि एक हक्काचं आधारस्तंभ बनते. आईच्या या भूमिकेची जाणीव लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत होत जाते. सकाळपासून रात्रीपर्यंत ती घरासाठी झटत असते.तिच्या प्रत्येक कृतीत मुलांसाठी निस्वार्थ प्रेम दडलेले असते.वडिलांचा अभाव जाणवू नये म्हणून ती कधी कधी कठोर बनते, निर्णयक्षमता दाखवते आणि संसारातली उणीव जाणवू देत नाही. आईचा हा प्रवास नेहमीच सोपा नसतो.समाजाच्या अपेक्षा, आर्थिक अडचणी,मानसिक ताणतणाव यांचा सामना करत ती आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवते.तिच्या या संघर्षातून मुलांना धैर्य,मेहनतीचे महत्त्व,आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं धडे मिळतात.त्या प्रत्येक यशामागे तिचा आशीर्वाद आणि तिचं कठोर परिश्रम असतात. जगात कोणत्याही नात्याला आईच्या नात्याची सर नाही. वडिलांचं स्थान भिन्न आहे,पण जेव्हा परिस्थिती तीव्र होते,तेव्हा आई या दोन्ही भूमिका निभावते. तिच्या मायेने आणि प्रेमाने मुलं फुलत जातात आणि तिच्या संस्कारांनी ते एक चांगलं भविष्य उभं करतात.म्हणूनच आईमुळेच आण्णांची उणीव भरून निघाली,हे वाक्य खूप सार्थ ठरतं. आई हा शब्द केवळ तीन अक्षरी असला,तरी त्यामध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे.तिचं महत्त्व शब्दांत मांडता येणार नाही.ज्या घरात वडिलांची उणीव असते, तिथे आईचं हे बलिदान अधिक अधोरेखित होतं.आईचं हे अमूल्य योगदान आपल्याला आयुष्यभर आठवत राहतं आणि तिच्या कर्तृत्वाला मान डोकं झुकवतं. कारण खरोखरच,आईमुळेच कोणतीही उणीव भरून निघते! कुटुंबातील ताणतणाव,जबाबदाऱ्या,आणि अपूर्ण स्वप्नं यांचा भार जेव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो,तेव्हा त्या काळातलं मार्गदर्शन आणि संस्कार फार महत्त्वाचे ठरतात. अशोकदादा,अनिलबापू व मी तीन भावंडांमध्ये अशोक दादांवर आलेली जबाबदारीही काहीशी अशीच होती.वडिलांच्या शिक्षण संस्थेची धुरा त्यांच्यावर पडली, पण या वाटचालीत त्यांना योग्य मार्ग दाखवणारी आणि मानसिक आधार देणारी त्यांची आईच होती. शिक्षण संस्थेची जबाबदारी आणि सुरुवातीचे अडथळे अशोक दादांवर शिक्षण संस्थेची जबाबदारी आली तेव्हा सुरुवातीला परिस्थिती कठीण होती.संस्थेचे व्यवस्थापन, आर्थिक अडचणी,आणि शिक्षणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यासमोर उभी होती. आण्णांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही संस्था तितक्याच निष्ठेने आणि धैर्याने पुढे नेणं गरजेचं होतं.पण या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने ते कधी कधी अस्वस्थ होत.त्यातच दोन भावंडं असले तरी संपूर्ण भार त्यांच्यावरच होता. आईचं अस्तित्व अशोक दादांसाठी एक प्रेरणास्थान होतं. परिस्थिती कितीही कठीण असो, तरीही आईने आपली सकारात्मकता कधीही गमावली नाही.आईने अशोक दादांना शांत मनाने निर्णय घ्यायला शिकवलं. ज्या गोष्टींवर ताबा आहे,त्यात लक्ष द्या,बाकी सगळं विश्वासाने सोडून द्या असा आईचा सल्ला त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरला. आईनेच त्यांना माणसांना जोडण्याचं महत्त्व शिकवलं.आई सांगायची की,शिक्षण ही केवळ व्यवस्था नाही,ती एक चळवळ आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करताना प्रामाणिक राहा; लोक तुम्हाला साथ देतील. अशोक दादांनी हा मंत्र आचरणात आणला आणि संस्थेतील प्रत्येक गोष्ट तंतोतंत सांभाळण्याचा प्रयत्न केला. आईने अशोक दादांना केवळ संस्था सांभाळायला शिकवलं नाही,तर भावंडांमधील नातं घट्ट ठेवण्याचं महत्त्वही पटवलं. परिस्थिती काहीही असो, भावंडांनी एकमेकांना आधार द्यायला हवा,हा तिचा नेहमीचा संदेश होता.अशोक दादांनी आईच्या या शिकवणीचा आदर केला आणि आपल्या दोन भावंडांनाही शिक्षण संस्थेच्या कामात गुंतवलं.आईच्या शिकवणीमुळेच तिघांनी मिळून संस्थेचं भवितव्य उभं केलं. आईच्या प्रेरणेमुळे अशोक दादांनी फक्त संस्थेची धुरा यशस्वीपणे सांभाळली नाही,तर संस्थेला नवीन उंचीवर नेलं. शिक्षणाच्या गुणवत्तेपासून ते संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनापर्यंत,आईच्या मार्गदर्शनाने त्यांना प्रत्येक गोष्टीत अडचणींवर मात करण्याची शिकवण मिळाली. आईचं मार्गदर्शन हे कधीही व्यक्त व्हावं असं नसतं,ते शांतपणे आपल्या आयुष्यात मार्ग दाखवतं.अशोक दादांच्या यशस्वी वाटचालीचं खरं श्रेय आईच्या शिकवणुकीला जातं.ती केवळ त्यांची आई नव्हती,तर त्यांच्या निर्णयक्षमता आणि निश्चयाची मार्गदर्शक होती.म्हणूनच अशोक दादांनी शिक्षण संस्थेची जबाबदारी मोठ्या आत्मविश्वासाने पार पाडली आणि आण्णांचं स्वप्न साकार केलं. आईच्या प्रथम स्मृतिदिनी नतमस्तक ..!
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले