कळंब – महाराष्ट्र पोलिस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अनंत साहेबराव घोगरे पाटील,गोविंदपुर तालुका कळंब यांना महाराष्ट्रा पोलिस मित्र सोशल असोशिएन महाराष्ट्र राज्य यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस राज्य स्तरीय जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर झाला असून अनंतराव घोगरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व योगदानाबद्दल हा पुरस्कार असून पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगीरे, गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र प्रदेश सचिव अच्युतराव माने, eps-95 सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ आंधळे यांनी अभिनंदन केले आहे सामाजिक,शैक्षणिक,राजकीय, न्याय,आरोग्य,शेती,व्यवसाय, उदयोग,तसेच इतर क्षेत्रात उल्लेखणीय कार्य केले व सामाजिक बांधिलकीचे जतन करून,निस्वार्थ भावनेने समाजसेवाकांना नेताजी सुभाषचंद्र बोस राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर