February 10, 2026

प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लहू पारवे यांचा सत्कार

  • कळंब- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करून समाज बांधवांसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.याचा उपयोग करून समाजातील वंचित उपेक्षित व मदतीची गरज असलेल्यांना मदत कशी मिळेल कोणावर अन्याय होणार नाही यासाठी कार्य करीत राहीन.यापूर्वीही आपण यासाठी पाठबळ दिले आहे.यापुढे ही ज्येष्ठांचे आशीर्वाद व व कार्यकर्त्यांचे सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लहू पारवे यांनी दिनांक 20 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह कळंब येथे विविध संघटनांच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भडंगे व प्रमुख पाहुणे एस.एम. गुळवे ,मुंबई व उपस्थित कार्यकर्त्यांनी लहू पारवे यांचा शाल,फेटा,भला मोठा पुष्पहाराने व पेढे भरून सत्कार केला. याप्रसंगी एस.एम.गुळवे यांनी लहू पारवे यांचे जनसामान्यातील कार्य व त्यांचा मित्र परिवाराच्या वतीने होत असलेला सत्कार यामुळे आपण भारावून गेलो आहोत असे सांगून वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी या पदाच्या माध्यमातून ते कार्यरत राहतील तर याप्रसंगी कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पारवे यांनी गरजू लोकांना केलेली मदत व कार्य याविषयी काही आठवणी व प्रसंग सांगितले व या निवडीचे स्वागत व अभिनंदन केले व समाजासाठी शासनाचे झालेले निर्णय व प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा व्यक्त केली तर आपले अध्यक्षीय भाषणात सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भडांगे यांनी लहू पारवे महाराष्ट्र पातळीवर कार्य करीत असले तरी कळंब तालुका व धाराशिव जिल्ह्यातील प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला.या कार्यक्रमाची प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रमाचे संयोजक बंडू (आबा ) ताटे यांनी केले तर आभार सचिन क्षिरसागर यांनी मानले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीतात विकास भंडारे,माधवसिंग राजपूत, विकास गायकवाड,हनुमंत पाटोळे, रोहित कसबे, गोकुळ कांबळे, किशोर मगर, दत्तात्रेय ताटे, धनंजय ताटे, बालाजी खंडागळे, रफीक पिजारी, विकास गायकवाड, हानुमंत कांबळे, रोहीत कसबे, दत्तत्रय ताटे,अतुल झोंबाडे, दत्ता झोबांडे, शरद झोंबाडे, अशोक झोंबाडे, अजय कांबळे,वैजनाथ डोंगरे यांच्यासह कार्यकर्त्याची उपस्थित होती.
error: Content is protected !!