कळंब – विद्यार्थी विकास मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय (मराठी विभाग ) यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमाला १६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक न्याय या विषयावर पुष्प गुंफताना प्रा. डॉ.शैलजा बरुरे (स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई जि.बीड) म्हणाल्या, “लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजवली केली. अशा या समताधिष्ठित सामाजिक न्यायाच्या संकल्पनेमागे महात्मा फुले यांची प्रेरणा होती.सार्वत्रिक आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात केली,जे पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड असा आदेशही काढला होता. शिक्षण ही समाजपरिवर्तनाची पहिली पायरी असते, हे केंद्रस्थानी ठेवून व कायद्याचे पाठबळ देऊन सामाजिक क्रांती घडवली.” सदर एक दिवसीय दिवसीय राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमालेचे उद्घाटक डॉ. अशोकराव मोहेकर (सचिव, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा) यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते म्हणाले, “शाहू महाराज त्यांच्या संस्थानात गोर गरीब बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची सुविधा, आरोग्यासाठी – व्यायामशाळा, वसतिगृह तसेच जलसिंचनासाठी राधानगरी धरण अशा लोककल्याणकारी बाबींची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली,त्यामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे प्रणेते ठरतात.” राजर्षी शाहू महाराज आणि संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. व्यासपीठावर प्रा.डॉ.संजय कांबळे, (अधिसभा सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ),उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,सोपान पवार (सहशिक्षक- विद्याभवन हायस्कूल, कळंब )अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुनिल पवार उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी,व्याखानमालेचे प्रास्ताविक आणि अतिथी परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. दादाराव गुंडरे तर उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. के.डी. जाधव मानले.प्रा.डी.एन.चिंते, प्रा.डॉ.नागनाथ आदाटे,प्रा. ए.आर.मुखेडकर,डॉ.एम.बी. जाधव,प्रा.डॉ.पल्लवी उंदरे, प्रा.समाधान चंदनशिवे, प्रा.विकास शिंदे यांची उपस्थित होती.संदीप सूर्यवंशी,अधीक्षक हनुमंत जाधव, इक्बाल शेख, चांगदेव खंदारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन