August 9, 2025

नामदार ढसाळ दलित पॅंथरचा झुंजार कणा!

  • ( १५ जानेवारी २०२५) भारतीय रिपब्लिकन पक्षाचे समन्वयक पद्मश्री नामदेव ढसाळ दलित पँथर चळवळीचा झुंजार लढवय्या, विद्रोही साहित्यीक “नामदेवा” निळा सलाम!आमचे साहित्यगुरु “पद्मश्री नारायणदादा सुर्वे”,यांचे दुःखद निधन झालं तेव्हा मुंबई मराठी साहित्य मंडळाच्या कार्यालयासमोर,”नामदेव ढसाळ” यांची भेट झाली होती. तेव्हा थोडक्यात जयभीम झाला. कारण सर्वच शोकाकूल.! मा.प्रकाश आंबेडकर, उत्तम कांबळे सर, लोककवी प्रा.प्रशांत मोरे मास्तराची सावली, अभिनेत्री नेहाताई सावंत,म.भा.चव्हाण, तत्कालीन कामगार मंत्री सचिनभाऊ अहिर,भाई जगताप, शिक्षक आमदार,बरीच दिग्गजांची मांदियाळी, नामदेव ढसाळ व्हील चेअरवर आले होते.तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख असताना मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर “दादांची आणि आमची भेट झाली.त्यवेळी मी, माझा “जागल्या” कवितासंग्रह भेट दिला. तेव्हा व्वा व्वा क्या बात है.? मुखपृष्ठ पाहिलं. अन् माझ्याकडे पाहिलं. छान जमलं. एवढं बोलले. मीही घाईत होतो. जयभीम केला. निघालो.ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले तेव्हा अध्यक्ष होते.सूर्यनारायणा नारायणदादा सुर्वे यांचे साहित्यनगरी असे नाव होते. पद्मश्री नारायणदादा सुर्वे यांचे मानसपुत्र आमचे मार्गदर्शक “फिरस्तीकार” मातृत्वावर भरभरून लिहीणारे, दै. सकाळ वृत्तपत्रसमुहाचे व्यवस्थापकीय संचालक आदरणीय उत्तम कांबळे सर होते. कांबळे सर व तत्कालीन जिल्ह्याधिकारी आबासाहेब ज-हाड यांच्या समवेत साहित्य दिंडीत आम्हाला सहभागी होता आले.साहित्यसंमेलनाच्या पुढे पद्मश्री नामदेव ढसाळ वाचकट्टा अर्थात नवोदितांचा जागर झाला.आम्ही “पद्मश्री नारायणदादा सुर्वे यांना आमची “सुर्वे सर” कविता भावपूर्ण अभिवादन म्हणून अर्पण केली.टाळया वाजल्या.गरिबी भोगलेल्या जीवांनी क्रांती केली. असे आम्हाला वाटते.”नामदेव ढसाळ” यांच्या विद्रोही साहित्याने, सारस्वतासहित भल्याभल्यांना हाबाडा बसला. तसा गर्भश्रीमंतीतील मुजोरांनाही..! नामदेव ढसाळांनी कोणालाही सोडले नाही.त्यांचा “गोलपिठा” विशेष गाजला. “नामदेवा, तूझा संगर सर्वांना ज्ञात व्हावा म्हणून संविधान शिल्पकार मानव मुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वैचारिक वारसा, पाऊलवाट अधोरेखित करताना भूतकाळाशी जोडताना भविष्यकाळ उज्ज्वल रहावा यासाठी आमची सामाजिक उत्थानासाठीची तळमळ..!बाकी उरले ते माझेच सारं काही समिष्टीसाठी..
    भावपूर्ण अभिवादन “नामदेवा” क्रांतिकारी निळा सलाम.!
  • @ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे
  • महाराष्ट्र शासन, सोशल मिडिया ठाणे जिल्हा +९३२४३६६७०९
error: Content is protected !!