August 8, 2025

पतंगासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करणार — पोलीस निरीक्षक रवी सानप

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघाता विषयी कळंब पोलीस स्टेशन येथे जनजागृती बैठक घेण्यात आली.या बैठकीत पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी मार्गदर्शन केले व पतंगासाठी नायलॉन मांजा वापर करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले मकर संक्रांतीनिमित्त पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते.यानिमित्त उंच उंच पतंग उडविण्यासाठी स्पर्धा घेतल्या जातात किंवा पतंग उडविण्याचा खेळ खेळला जातो हे पतंग हवेत उंच राहावेत व इतरांपेक्षा आपला पतंग उंच रहावा व तो टिकावा यासाठी पतंगाला नायलॉन मांजा वापरला जात असून हा मांजा डोळ्यास दिसत नसल्याने रस्त्यावरून अथवा इतर ठिकाणाहून पायी प्रवासी करणारे पदचारी अथवा मोटर सायकल स्वार तसेच आकाशात उंच उडणारे पक्षी यात अडकले जात असून अपघात होत आहेत. यामध्ये जीव गमवावा लागत आहे.याचे वाढते प्रमाण लक्षात घेता पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापर करूनये यासाठी पोलीस प्रशासनाने जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकास आवाहन केले आहे. यासाठी कळंब पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात पतंग विक्रेते,नागरिक तसेच विद्यार्थी यांना पतंगाच्या नायलॉन मांजामुळे होणारे धोके व अपघात याविषयी माहिती देण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीस कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार कळंब ,पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रत्यक्ष शाळेत व दुकानास भेट देऊन सूचना व जनजागृती करण्यात आली याप्रसंगी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे यांनी मानले.
error: Content is protected !!