August 10, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.05 जानेवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 447 कारवाया करुन 3,71,250 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-सतीश मारुती माने, वय 52 वर्षे, रा.बालाजी नगर, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.05.01.2025 रोजी 15.05 वा. सु. चैतन्य बारचे पाठीमागे उमरगा येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-चॉद रशिद शेख, वय 41 वर्षे, रा. काळे प्लाट, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.05.01.2025 रोजी 16.20 वा. सु. प्रभात हॉटेलच्या पाठीमागे उमरगा येथे अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-नागनाथ मारुती सोनटक्के, रा.कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.05.01.2025 रोजी 17.10 वा. सु. जय मल्हार हाँटेलच्या पाठीमागे अंदाजे 1,040 ₹ किंमतीच्या 15 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रामभाउ भगवान जैन, वय 62 वर्षे, रा.माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांचे माणकेश्वर शिवारातील शेत गट नं 399 यांचे व त्यांचे शेता शेजारील बापू श्रीपती केळे यांचे गेाठ्यातुन एक म्हैस व एक रेडकू एक बैल असे एकुण 63,000₹ किंमीचे जनावरे हे दि. 04.01.2025 रोजी 19.00 ते दि. 05.01.2025 रोजी 05.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रामभाउ जैन यांनी दि.05.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे-प्रेमदास उमा राठोड,अर्जुन नामदेव राठोड, नामदेव उमा राठोड,अजय उर्फ बबन प्रेमदास राठोड, सर्व रा. वडाचा तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.01.2025 रोजी 21.00 वा. सु.वडाचा तांडा येथे फिर्यादी नामे-सुमनबाई किसन राठोड, वय 75 वर्षे, रा. वडाची तांडा जि. धाराशिव यांना व त्यांचे पती किसन लिंबा राठोड, नातु श्रीनिवास गोविंद राठोड यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुमनबाई राठोड यांनी दि.05.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1),333, 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- प्रभाकर बळीराम हत्तरगे, ज्ञानेश्वर व्यंकट हत्तरगे, विष्णु प्रभाकर हत्तरगे, व्यंकट बळीराम हत्तरगे, मोनिका विष्णु हत्तरगे,गोजर व्यंकट हत्तरगे सर्व रा. कडोदरा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.05.01.2025 रोजी 17.00 वा. सु. कडोदरा शिवारातील शेत गट 184 मधील सामाईक बांधालगत फिर्यादी नामे-सचिन गोविंद हत्तरगे, वय 32 वर्षे, रा. कडोदरा ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांची आई रुक्मीनीबाई व अत्या शारदाबाई काळे यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले.व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सचिन हत्तरगे यांनी दि.05.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 115(2),189(2), 191(2), 190, 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अगंद किसन वेदपाठक, विजय अंगद वेदपाठक दोघे रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 04.01.2025 रोजी 11.30 वा. सु. दि. 05.01.2025 रोजी 16.53 वा. सु. ईट येथे सोन्याचे दुकाना समोर व मोबाईलवर फिर्यादी नामे- सुरज सुभाष वेदपाठक, वय 33 वर्षेद्व रा. ईट ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. फोनवर जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरज वेदपाठक यांनी दि.05.01.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-वैभव रत्नकुमार नलावडे, वय 30 वर्षे, रा. वारेवडगाव ता. भुम जि. धाराशिव व सोबत मित्र- मयत नामे-अतुल जयसिंग नलावडे, जखमी नामे- औदुंबर नलावडे, अंगद भागवत नलावडे, विजय मारुती फोके हे सर्वजन दि.31.12.2024 रोजी 17.45 वा. सु. कार क्र एमएच 12 टीवाय 1960 मधून जात होते. दरम्यान बार्शी उड्डानपुलाचे थोड्या अंतरावर एनएच 52 रोडवर डस्टर कार क्र एमएच 25 आर 5281 चा चालक आरोपी नामे- जगदीश सुभाष शिंदे, रा. बावी ता. जि. धाराशिव यानी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून वैभव नलावडे यांचे कारला धडक दिली. या अपघातात अतुल नलावडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर वैभव नलावडे, औदुंबर नलावडे, अंगद नलावडे, विजय फोके हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. आरोपी स्वत:पण जखमी होवून दोन्ही कारचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैभव नलावडे यांनी दि.05.01.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106 (1), 324 (4) (5) सह कलम 184 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!