कळंब – 06 जानेवारी रोजी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण ची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केली. यानिमित्त 06 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो व पत्रकारांचा गुणगौरव केला जातो. कळंब येथील सेवा पुरस्कार समितीच्या वतीने पत्रकारितेच्या माध्यमातून व आपल्या लेखणीतून सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य विषयक व सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या उत्कृष्ट लेखन व वृत्तांकन करणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारांचा गत 12 वर्षापासून प्रतिवर्षी आदर्श दर्पण पुरस्काराने सन्मान केला जातो यावर्षीचे पुरस्कार,सेवा पुरस्कार समिती कळंबचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी जाहीर केले असून पुरस्कारचे मानकरी नरसिंग धोंडीराम खिचडे ( संपादक साप्ताहिक तेरणा एक्सप्रेस ), संदीप अशोक कोकाटे ( संपादक साप्ताहिक नमस्ते धाराशिव व ई पेपर,सोशल मीडिया वृत्तवाहिनी ),शाम बाबुराव जाधवर ( कळंब तालुका प्रतिनिधी दैनिक आरंभ मराठी ) यांचा समावेश आहे पुरस्कार वितरण सोहळा 10 जानेवारी,शुक्रवार रोजी संत ज्ञानेश्वर बालकाश्रम तांदुळवाडी रोड कळंब येथे मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन