मुंबई – परभणी येथील घटनेत पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे संविधान रक्षणासाठी झटणारा आंबेडकरी तरुण शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची घटना संशयास्पद असून,या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी तसेच सरकारकडे ठोस मागण्या मांडण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी दिनांक १६ डिसेंबर २०२४, रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले आहे. या बंदच्या माध्यमातून प्रमुख मागण्या- आंदोलकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत,अटकेत असलेल्या सर्व आंदोलकांची सुटका करण्यात यावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी,शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे. सर्व आंबेडकरी,संविधानवादी पक्ष आणि संघटना,तसेच न्यायप्रिय नागरिकांनी या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन बंद यशस्वी करावा,असे आवाहन करण्यात येत आहे.
More Stories
आंबडवे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्विकासाचा आराखडा तयार करा – राज्यमंत्री योगेश कदम
हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन
अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती