August 8, 2025

मधुकर धस यांना अभिवादन

  • उमरगा – पाणीदार माणूस मधुकर धस यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्ताने तुरोरी तालुका उमरगा या ठिकाणी समाधीस पुष्पहार अर्पण करून समाज विकास संस्थेचे सचिव महाराष्ट्र लोकविकास मंचाचे कार्यकर्ते भूमिपुत्र वाघ,अनाथाची माय विद्याताई वाघ,आप्पा जाधव,भाग्यश्री मोरे,आफ्रिन मुल्ला,कृष्ण पाटील,प्रशांत ढवळे यांनी अभिवादन केले.
    भोगजी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी जन्म झालेले मधुकर धस हे 1990 झाले यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेले.त्या ठिकाणी दिलासा संस्था स्थापन करून महाराष्ट्रातल्या 14 ते 20 जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी काम केलं.महाराष्ट्रातील विशेष थोर समाजसेवक,बाबा आमटे, मकरंद अनासपुरे,नाना पाटेकर, विश्वात्मा तोडकर,आमिर खान, देवेंद्र फडणवीस यांना वेड लावणारे कार्य मधुकरणी पाण्यासाठी उभे केले.
    या जलनायकास समाज विकास संस्था महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
error: Content is protected !!