September 24, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा निजाम काळात ग्रामीण भागात ज्ञानाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्यास दि.२८ नोव्हेंबर २०२४ वार गुरुवार रोजी अजित पवार राष्ट्रवादीचे वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुशिल शेळके यांच्या हस्ते कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव तथा सा.साक्षी पावनज्योतचे मार्गदर्शक डॉ.अशोकरावजी मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनील पवार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!